या व्हायरल दृष्टीभ्रमात एक मांजर आणि मूस लपलेले आहेत. तुम्हाला कोणता प्राणी दिसतो?

सोशल मीडियावर सध्या एखाद्या फोटोत लपून बसलेला प्राणी शोधून दाखवा असे अनेक इल्युजन म्हणजेच दृष्टीभ्रम तुम्ही बघितले असतील. डोकं लढवून एखादे कोडे सोडवावे तसे हे इल्युजन सोडवले की आनंद होणे साहजिक असतो. म्हणूनच हे इल्युजन मोठया प्रमाणावर व्हायरल होत असतात.

पण आज आपण बघणार आहोत तो दृष्टीभ्रम थोडा वेगळा आहे. या फोटोत तुम्हाला मांजर आणि मूस म्हणजे हरीण कुलातला एक प्राणी यापैकी कुठला प्राणी दिसतो हे बघायचे आहे. यातून तुमचा मेंदू डावखुरा आहे की उजवा हे समजेल असा दावा करण्यात आला आहे. पण गंमत अशी आहे की जास्तच जर का फोटो झूम करून बघितला किंवा खूप टक लावून पाहिले तर या चित्रातला प्राणीच गायब होतो.

टॉम हिक्स नावाच्या एका ट्विटर युजरने हे इल्युजन शेयर केले आहे. तो म्हणतो की, 'तुमचा डावा मेंदू अधिक काम करतो की उजवा हे तुम्हाला इल्युजन सोडविल्यानंतर समजणार आहे.' विशेष म्हणजे यात कुठलाही प्राणी नसून याची रचना फक्त तशी करण्यात आली आहे.

 

 

आता हे इल्युजन सोडविण्याचा प्रयत्न करून बघितलेल्या लोकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना या फोटोत मांजर दिसत आहे. तर काहींना तर कुठलाही प्राणी यात दिसला नाही. एकाने लिहिले मला मांजर सोडून दुसरे काहीही दिसले नाही. तर दुसरा म्हणतो, माझा मेंदू समतोल असावा कारण मला काहीच दिसत नाही.

मात्र हे इल्युजन शेयर करणाऱ्या युझरने नेमका कोणता प्राणी दिसल्यावर कोणत्या बाजूचा मेंदू काम करतो हेच स्पष्ट केलेले नाही. एक गोष्ट आहे की जेव्हा माणसाचा डावा मेंदू अधिक कार्यशील असतो तेव्हा ती व्यक्ती हा अधिक तार्किक समजला जातो तर उजवा मेंदूवाला मनुष्य हा क्रिएटिव्ह समजला जातो.

तुम्हाला नेमका कोणता प्राणी दिसला हे मात्र कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका...

उदय पाटील

 

सबस्क्राईब करा

* indicates required