हे आहेत आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारे ५ फलंदाज, दोन भारतीय कर्णधारांचा समावेश
इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धा (Ipl 2022) येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. यावेळी जेतेपद मिळवण्यासाठी ८ नव्हे तर १० संघ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे दुप्पट मनोरंजन होणार या काहीच शंका नाही. आतापर्यंत या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला आहे. आगामी हंगामात देखील अनेक असे फलंदाज आहेत, जे चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडू शकतात. तसेच आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दोन भारतीय कर्णधारांचा समावेश आहे. चला तर पाहूया कोण आहेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज.
कायरन पोलार्ड :
मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक फलंदाज या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. कायरन पोलार्डने आतापर्यंत एकूण १७८ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने एकूण २१४ षटकार मारले आहेत.
एमएस धोनी:
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत एकूण २२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने आतापर्यंत २१९ षटकार मारले आहेत. सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.
रोहित शर्मा :
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. अप्रतिम नेतृत्वाच्या जोरावर त्याने या स्पर्धेत ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरले आहे. परंतु सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत त्याने या स्पर्धेत एकूण २१३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने २२७ षटकार मारले आहेत.
एबी डीविलियर्स :
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे मिस्टर ३६० म्हणजेच एबी डीविलियर्स. आयपीएल २०२२ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एबी डीविलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आयपीएल स्पर्धेत एकूण १८४ सामने खेळले. ज्यामध्ये त्याने एकूण २५१ षटकार मारले आहेत.
ख्रिस गेल :
या यादीत सर्वोच्च स्थानी आहे युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल. आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारले आहेत. त्याने १४२ आयपीएल सामन्यांमध्ये तब्बल ३५७ षटकार मारले आहेत.




