बँकेत नोटा बदलून घेताना ही खबरदारी नक्कीच घ्या..

आपल्याला कित्येक ठिकाणी पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट यांच्या झेरॉक्सकॉपीज द्यायला लागतात. मग ते नवं सिम असो, हॉटेल बुकिंग, घर घेणं, म्युचुअल फंड्स किंवा एलआयसी पॉलिसी किंवा  उद्यापासून बँकेतून नव्या नोटा घ्यायचा प्रसंग. आपण लागतात म्हणून भरपूर झेरॉक्स घरी ठेवतो आणि लागतील तिथं देत जातो. या ओळखपत्रांवर आपला फोटो, जन्मतारिख, पत्त्ता अशा बर्‍याच गोष्टी असतात.  या सर्व कागदपत्रांवर आपली सहीसुद्धा लागतेच. बरेचदा या झेरॉक्स कॉपीज बिन्धास्त सही करून त्या दुकानदाराला दिल्या जातात. 

 

जरा विचार करा, आपल्या सहीनिशी असलेली ही आपली ओळख , पत्ता सांगणारी कागदपत्रे दुसर्‍या कुणाच्या हाती पडली तर? तर भारतात कुणीतरी-कुठेतरी  नवा गुन्हा करण्यासाठी  आपल्या नाव्याने सिम घेत असेल किंवा आता आपल्या नावाने बँकेतून  पैसे काढत असेल किंवा आपल्या नावाने हॉटेलमधली रूम बुक तिथं राहात असेल.. आजकालच्या झेरॉक्स मशीनसुद्धा खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत. पूर्वी चांगली निघाली नाही या नावाखाली झेरॉक्सची कॉपी दुकानदार स्वत:च ठेवून घ्यायचा. आता तर सरळ झेरॉक्स मशीनच्या मेमरीतच ओळखपत्र साठ्वता येतं. पण मग त्यावर आपली स्वाक्षरी म्हणजेच सेल्फ अटेस्टशन असल्याशिवाय ती कागदपत्रं ग्राह्य धरली जात नाहीत.

म्हणूनच जेव्हा जेव्हा आपलं सहीसोबतच्या ओळखपत्राची झेरॉक्स जिथे जिथे द्याल, तिथे तिथे त्यावर खालील माहिती लिहा-

१. ओळखपत्र कशासाठी दिलं

२. ओळखपत्र कुणाला दिलं

३. तारीख

४. वेळ

५.काही लोकांचं असंही म्हणणं आहे की  नोटा बदलत असताना त्यावर किती रकमेच्या किती नोटा बदलून घेतल्या ते ही लिहा. 

भारतासारख्या जुगाडू देशात  खोटी कागदपत्रं तयार करणं किंवा दुसऱ्याची कागदपत्रं वापरणं काही नवीन नाही. पण मग आपली काळजी आपणच घ्यायला हवी. म्हणून आपल्या कागदपत्रांवर ही माहिती लिहिण्याची सवय अंगी लाऊन घ्या.

 

 

 

सबस्क्राईब करा

* indicates required