मुंबई-पुणेकरांसाठी विकेंड ट्रेक्स...
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा.. अशा महाराष्ट्र देशात गडकिल्ल्यांची कमी नाही. नागफणी, कर्नाळा, लोहगड-कार्ले ही ठिकाणं तशी मुंबई आणि पुण्याहून तितकीच जवळ. आज आम्ही घेऊन आलो आहोत मुंबई-पुणेकरांसाठी विकेंड ट्रेकसाठीची काही ठिकाणे.
अलंग-मदन-कुलंग गड ट्रेक:अवघड आणि तितकाच आव्हानात्मक..
अलंग-मदन-कुलंग हा चॅंपियन्सचा आवडता ट्रेक आहे. इथं निसर्गासोबत खेळ केलात तर मात्र जीवासोबतच खेळ होऊ शकतो.
तिकोना
तिकोना नावाप्रमाणेच पायथ्यापासून पाहिल्यास त्रिकोणी दिसतो. तिकडे जायचे असल्यास पुणे - कोळवण बस घेउन गडाच्या पायथ्या्च्या थोडे जवळ जाता येते किंवा कामशेतहून काळे कॉलनीमार्गे तिकोना पेठेत पोहोचता येते.
तोरणा
शिवरायांनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. खरंतर तोरणा इतका मोठा आहे की त्याचं खरं नांव प्रचंडगड आहे. पुण्याहून तोरणा अवघ्या दोन तासांच्या अंतरावर आहे




