computer

या पाकिस्तानी खेळाडूंच्या धर्मपत्नी समोर अभिनेत्री देखील आहेत फेल!! एकदा पाहाच

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येत असतात तेव्हा चाहत्यांना रोमांचक लढत पाहायला मिळत असते. दुर्देवाने हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येतात. गतवर्षी झालेल्या आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने भारतीय संघाला पराभूत करण्याचा कारनामा केला होता. या ऐतिहासिक कामगिरीनंतर पाकिस्तान संघाचे अनेक दिग्गजांनी कौतुक केले होते.

 पाकिस्तान संघाला विजय मिळवून देण्यात बाबर आजम,शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद रिजवान सारख्या खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले होते. खेळाडूंचा उल्लेख झाला तर त्यांनी केलेल्या विक्रमांचा देखील उल्लेख होतो. तसेच त्यांनी केलेल्या विक्रमांसह अनेकांना खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल देखील जाणून घ्यायचे असते. पाकिस्तान संघातील काही खेळाडूंच्या धर्मपत्नी इतक्या सुंदर आहेत की, त्यांच्या समोर बड्या बड्या अभिनेत्री देखील फेल आहेत. चला तर पाहूया.

१) शाहिद आफ्रिदी

Shahid Afridi

पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याने पाकिस्तान क्रिकेट मध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्याने आपल्या मामाची मुलगी, नादिया सोबत विवाह केला.या दोघांचा जेव्हा विवाह झाला होता. तेव्हा हे खूप चर्चेत आले होते. नात्यात असल्याने हे दोघेही एकमेकांना चांगलेच ओळखतात.

२) मोहम्मद हाफिज

Mohammad hafeez

 पाकिस्तान संघाचा वरिष्ठ खेळाडू मोहम्मद हाफिज याने मैदानात अनेकदा आपल्या अष्टपैलू कामगिरीने पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिला आहे. परंतु खऱ्या आयुष्यात त्याची पत्नी नाजीयाने त्याला क्लीन बोल्ड केले आहे. या दोघींनी ही २००७ मध्ये प्रेम विवाह केला होता. 

३) शोएब मलिक

Shoaib Malik

 पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक याने २०१० मध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा सोबत विवाह केला होता. सानिया आपल्या खेळामुळे जगप्रसिद्ध आहे. तसेच ती एक स्टाइल आयकॉन देखील आहे. 

 

४) हसन अली

Hasan ali

पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज हसन अली याने, २० ऑगस्ट २०१९ रोजी ,भारतीय फ्लाइट अटेंडंट शामिया आरजू सोबत विवाह केला होता. ती अनेकदा वेस्टर्न ड्रेस मध्ये दिसून आली आहे.

५) सरफराज अहमद

Sarfaraj Ahmed

पाकिस्तानी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद याला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते. परंतु त्याची पत्नी एखाद्या अभिनेत्रीला ही लाजवेल इतकी सुंदर आहे. हे दोघेही २००५ विवाह बंधनात अडकले होते.तसेच ती अनेकदा स्टेडियममध्ये आपल्या पतीला सपोर्ट करताना दिसून आली आहे.या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required