२० लाख लोकांसोबत मार्क झुकरबर्गला फेसबुकने दिली जिवंतपणीच श्रद्धांजली!!

जगातल्या सर्वात मोठ्या वेबसाईटकडून जेंव्हा छोटीशी चूक होते तेव्हा लोकांना कसा जोर का  झटका बसतो याचं उदाहरण म्हणजे ११ नोव्हेंबरची ही घटना...

गुगलनंतर सर्वात जास्त भेट दिली जाणारी वेबसाईट म्हणजे फेसबुक. या फेसबुकच्या भारी भारी फीचर्समुळे लोक त्याच्याशी किती अॅडीक्टेड झालेत हेही काही वेगळं सांगायला नको. पण शुक्रवारी या फेसबुकवर तब्बल २० लाख लोक मृत झाले. झाले म्हणण्यापेक्षा ते चुकून केले गेले. या सगळ्या लोकांच्या वॉलवर फेसबुककडून त्यांना मृत घोषित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फेसबुकच्या या चुकीमुळे लोकांचे धाबे चांगलेच दणाणले. विशेष म्हणजे या २० लाख लोकांसोबत खुद्द फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गच्या वॉलवरही हा श्रद्धांजलीचा संदेश पोस्ट झाला आणि सोशल मिडीयावर याची बेभान चर्चा रंगली... 

थोड्या वेळाने ही चूक फेसबुकच्या लक्षात आली. फेसबुकच्या प्रवक्त्याने याबबत स्पष्टीकरण देताना म्हटलं की खूप कमी वेळासाठी चुकीने श्रद्धांजलीचा संदेश काही लोकांच्या प्रोफाईलवर पोस्ट झाला. ही एक भयानक त्रुटी होती जी आता दूर केली गेली आहे. 
 

सबस्क्राईब करा

* indicates required