नो बॉल वर पडली रिंकू सिंगची विकेट?? सामन्यानंतर सोशल मीडियावर रंगलाय नवा वाद
कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२२ स्पर्धेतील रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांना विजय मिळवण्याची समान संधी होती. कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाचा फलंदाज रिंकू सिंग याने शेवटपर्यंत आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा सामना केवळ २ धावांनी गमावला. यासह कोलकाता नाईट रायडर्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.
रिंकू सिंगच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. शेवटच्या २ चेंडूंमध्ये ३ धावांची आवश्यकता असताना रिंकू सिंग बाद होऊन माघारी परतला. त्याने अवघ्या १५ चेंडूंमध्ये २ चौकार आणि ४ षटकारांचा मदतीने ४० धावांची तुफानी खेळी केली. शेवटी तो झेल बाद होऊन माघारी परतला.
रिंकू सिंग बाद झाल्यानंतर आता सोशल मीडियावर नवीन वाद रंगायला सुरुवात झाली आहे. काही क्रिकेट चाहत्यांचे म्हणणे आहे की, रिंकू सिंग ज्या चेंडूवर बाद झाला तो चेंडू नो बॉल होता. मार्कस स्टोइनिसचा गोलंदाजी करत असतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की, मार्कस स्टोइनिसचा पाय लाईनच्या जवळपास आहे. परंतु पंचांनी हा चेंडू नो बॉल घोषित केला नव्हता.
एका युजरने ट्विट करत लिहिले की,' ज्या चेंडूवर रिंकू सिंग बाद झाला तो नो बॉल होता... काय अंपायरिंग आहे..' तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, 'रिंकू सिंग बाद झाला तो नो बॉल होता.. तिसऱ्या अंपायरचे लक्ष कुठे होते..'
काय वाटतं मंडळी मार्कस स्टोइनिसने टाकलेला चेंडू नो बॉल होता का? कमेंट करून नक्की कळवा..




