या व्यापाऱ्याने खात्यात जमा केले ६००० कोटी; अधिक ५४००कोटींचा टॅक्स आणि दंड!!
काळ्या पैशावर लगाम घालण्यासाठी हजार, पाचशेच्या नोटांवर अचानक बंदी आणण्याचा मोदींचा प्लॅन एकीकडे सामान्य लोकांसाठी त्रासदायक ठरतोय, पण दुसरीकडे आता या क्रांतिकारी निर्णयाचे चांगले परिणामही दिसत आहेत. कर चुकवून साठवलेला अमाप पैसा एका रात्रीत मातीमोल झाल्याने अनेकांना भल्या थंडीत घाम फुटलाय...
आता सुरत मधल्या लालजीभाई पटेल या प्रसिध्द हिरे व्यापारी आणि बिल्डरने थोडे थोडके नव्हे तर चक्क ६००० कोटी रूपये सरकारकडे जमा केले आहेत. खरं तर लालजीभाई हे आपल्या दानशूर आणि समाजसेवी स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. यांची स्पेशल ओळख सांगायची म्हणजे पंतप्रधान मोदींचं नाव असलेला सुट लालजीभाईंनी ४.५ कोटींना लिलावात विकत घेतला होता. आणि मुलींच्या शिक्षणासाठी या भल्या माणसाने २०० कोटी दान केलेत. या ६००० कोटींसोबत त्यांना ३०% टॅक्स आणि २००% दंड म्हणुन जास्तीचे ५४०० करोड रुपये भरावे लागले!! एकंदरीत काळा पैसा यांना चांगलाच महागात पडला म्हणायचा. विशेष म्हणजे सावजीभाई ढोलकीया यांच्याप्रमाणेच लालजीभाई सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांना बक्षिस म्हणून कार आणि घरे देतात म्हणे. आता लालजीभाई तर शरण आले. पण या देशात अजून असे किती कुबेर आहेत ते देवच जाणे.
या निर्णयामुळे अनेकांना आपल्या या काळ्या धनाचं नेमकं काय करायचं? हा प्रश्न पडलाय. त्यामुळे कोणी या नोटा पाण्यात टाकतोय, कोणी कचर्यात टाकतोय, तर कोणी "पुण्य" (आत्ता सुचलेलं ) म्हणून गरिबांना वाटतोय. यावरून मोदींचं ताजं वक्तव्य आठवतंय.. "बडे लोगों को नींद की गोली, गरिबों को चैन की नींद!"




