रवी शास्त्री वाढदिवस विशेष: या सौंदर्यवतींबरोबर जोडले गेले होते शास्त्री गुरुजींचे नाव...

भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री शुक्रवारी (२७ मे) आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहेत. क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या खेळाडूने १९८३ विश्वचषक स्पर्धा जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. तसेच वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी रवी शास्त्रींनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा महत्वाची खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून देणारे रवी शास्त्री अनेक कारणांमुळे चर्चेत आले होते. तसेच त्यांचे नाव काही सौंदर्यवतींबरोबर देखील जोडले गेले होते. (Ravi Shastri birthday special)

एका षटकात सलग ६ षटकार मारून रवी शास्त्री यांनी गॅरी सोबर्सच्या विक्रमाची बरोबरी केली होती. असे देखील म्हटले जाते की, रवी शास्त्री यांना स्टार टेनिसपटू गॅब्रियला सबातिनी खूप आवडायची. त्यावेळी गॅब्रियला सबातिनी आपल्या खेळामुळे आणि लूक्समुळे चर्चेत असायची. तसेच रवी शास्त्री तिला भेटण्यासाठी अर्जेंटिनाला गेल्याची देखील अफवा उठली होती. मात्र ज्यावेळी गॅब्रियला सबातिनीला रवी शास्त्रींबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तिचे उत्तर असे होते की,'कोण आहे रवी शास्त्री...?' त्यावेळी अशी अफवा देखील पसरली होती की, रवी शास्त्रींनी तिला प्रपोज केला होता. परंतु तिने नकार दिला होता.

अर्जेंटिनाहून परतल्यानंतर रवी शास्त्री यांनी म्हटले होते की, ते काहीतरी काम असल्यामुळे अर्जेंटिनाला गेले होते. तसेच रवी शास्त्रीचे नाव प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री अमृता सिंग सोबत देखील जोडले गेले होते. दोघांचा फोटो मॅगझिनच्या मुखपृष्ठावर छापण्यात आला होता. असे वाटू लागले होते की, हे दोघेही लवकरच विवाह बंधनात अडकणार. परंतु रवी शास्त्री यांनी १९९० मध्ये रितू सिंग सोबत विवाह केला. तर अमृता सिंग आपल्या पेक्षा वयाने लहान असलेल्या सैफ अली खान सोबत विवाह बंधनात अडकली होती. विवाह होऊन १८ वर्ष उलटल्यानंतर रवी शास्त्री यांना मुलगी झाली.

रवी शास्त्री यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी १९८१ मध्ये न्यूझीलंड विरुध्द झालेल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी ८० कसोटी सामन्यात ११ शतक आणि १२ अर्धशतकांच्या साहाय्याने ३८३० धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना त्यांनी १५१ गडी देखील बाद केले होते. रवी शास्त्री यांच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, १५० वनडे सामन्यांमध्ये त्यांनी ४ शतक आणि १८ अर्धशतकांच्या साहाय्याने ३१०८ धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजी करताना त्यांनी १२९ गडी बाद केले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required