आयपीएल २०२२ स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारे टॉप ५ गोलंदाज, २२ वर्षीय खेळाडूचा देखील समावेश
आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेच्या अंतिम गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) संघाने राजस्थान रॉयल्स ( Rajasthan royals) संघाला ७ गडी राखून पराभूत केले. यासह पहिल्यांदाच आयपीएल स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाला ९ बाद १३० धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाने ७ गडी राखून हा सामना आपल्या नावावर केला. या हंगामात अनेक असे गोलंदाज होते ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या लेखातून आम्ही तुम्हाला टॉप ५ गोलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी आयपीएल २०२२ स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद केले.
१) युजवेंद्र चहल :
राजस्थान रॉयल्स संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने या हंगामात सर्वाधिक गडी बाद केले आहेत. चहलने या हंगामातील १७ सामन्यात ७.७५ च्या इकॉनॉमी रेटने २७ गडी बाद केले. ४० धावा खर्च करत ५ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. ज्यामध्ये एका हॅट्ट्रिकचा समावेश आहे. चहल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा फिरकी गोलंदाज ठरला आहे
२) वानिंदू हसरंगा:
वानिंदू हसरंगा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करताना या गोलंदाजाने १६ सामन्यात ७.५४ च्या इकॉनॉमी रेटने २६ गडी बाद केले. १८ धावा बाद करत ५ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
३) कागिसो रबाडा:
पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रबाडाने या हंगामातील १३ सामन्यात २३ गडी बाद केले. यादरम्यान ३३ धावा खर्च करत ४ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
४) उमरान मलिक :
सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक या यादीत चौथ्या स्थानी आहे.सनरायझर्स हैदराबादच्या या २२ वर्षीय वेगवान गोलंदाजाने आपल्या गतीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. मलिकने या हंगामातील १४ सामन्यात २२ गडी बाद केले.
५) कुलदीप यादव :
दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव या यादीत पाचव्या स्थानी आहे. कुलदीपने दिल्लीसाठी १४ सामन्यात २१ गडी बाद केले. यादरम्यान १४ धावा खर्च करत ४ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
यापैकी कुठल्या गोलंदाजाने तुम्हाला सर्वात जास्त प्रभावित केलं? कमेंट करून नक्की कळवा..




