हे आहेत आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयात शतक झळकावणारे टॉप -५ अनकॅप्ड फलंदाज..

आयपीएल (indian premier league) ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा आहे. जगभरातील क्रिकेटपटू या लीग स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तसेच आयपीएल स्पर्धेत काही युवा खेळाडू देखील खेळताना दिसून येत असतात. तर काही युवा खेळाडूंमध्ये इतकं कौशल्य असतं की, ते पहिल्याच हंगामात शतक देखील झळकवतात. या लेखातून आम्ही तुम्हाला टॉप ५ अनकॅप्ड खेळाडूंबद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी कमी वयात आयपीएल स्पर्धेत शतक झळकावले.

अनकॅप्ड खेळाडू म्हणजे काय?

आयपीएल स्पर्धेत जगभरातील सर्व खेळाडू सहभाग घेत असतात. जे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत ते युवा खेळाडूंसोबत आपला अनुभव शेअर करत असतात. तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धा खेळण्याची संधी मिळत असते. ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले नाहीये, त्या खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडू असे म्हणतात.

१) मनीष पांडे (Manish Pandey): 

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज मनीष पांडेने २००९ मध्ये अनकॅप्ड खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. वयाच्या १९ व्या वर्षी त्याने डेक्कन चार्जर्स संघाविरुध्द झालेल्या सामन्यात ७३ चेंडूंमध्ये ११४ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १२ धावांनी विजय मिळवला होता. त्याला आयपीएल २०२२ स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला ६ सामन्यात अवघ्या ८८ धावा करण्यात यश आले.

) देवदत्त पडीक्कल (Devdutt padikkal) :

आयपीएल २०२२ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा देवदत्त पडीक्कल आयपीएल स्पर्धेत शतक झळकावणाऱ्या अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ५२ चेंडूंमध्ये १०१ धावांची खेळी केली होती.

) रिषभ पंत ( Rishabh pant) :

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज, रिषभ पंतने वयवर्ष २० वर्ष आणि २१८ दिवस असताना आयपीएल स्पर्धेत शतक झळकावले होते. आयपीएल २०१८ स्पर्धेत त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) संघाचे प्रतिनिधित्व करताना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध शतक झळकावले होते. त्याने ६३ चेंडूंमध्ये १२८ धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले होते.

) शॉन मार्श ( Shaun Marsh) :

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज शॉन मार्श याने वयाच्या २५ व्या वर्षी किंग्स इलेव्हेन पंजाब संघासाठी शतक झळकावले होते. त्याने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात हा पराक्रम केला होता. त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलिया संघासाठी पदार्पण केले नव्हते. या हंगामात त्याने ऑरेंज कॅप देखील मिळवली होती.

५) रजत पाटीदार (Rajat Patidar) :

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करताना रजत पाटीदारने वयाच्या २८ व्या वर्षी तुफानी शतक झळकावले. त्याने लखनऊ सुपर जायंट्स विरुध्द हा पराक्रम केला होता. त्याने ४९ चेंडूंमध्ये ११२ धावांची विस्फोटक खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या सामन्यात विजय देखील मिळवला होता.

काय वाटतं, रिषभ पंत प्रमाणे रजत पाटीदारला देखील भारतीय संघात स्थान मिळेल का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required