माक्स्ड आधार म्हणजे काय? कसे डाऊनलोड करावे हे ही इथे जाणून घ्या..
आधार कार्ड हे सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. बहुतांश ठिकाणी आधार दाखवल्याशिवाय पुढे सरकता येत नाही. आधार कार्डबद्दल काही सांगण्याची गरज नाही. पण आधारची सुरक्षा या विषयाबद्दल तर सांगायलाच हवे. इतर अनेक ओळखपत्रांप्रमाणे आधारचा पण गैरवापर होऊ शकतो. म्हणून सरकारकडून आपले आधार सरकारी संस्था सोडल्या तर कुणासोबत सामायिक करू नका असे सल्ले दिले गेले आहेत.
आधारच्या सुरक्षेसाठी सरकारने एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मास्क्ड आधार असे त्या पर्यायाचे नाव. काही महिती लपवण्याला मास्किंग असे म्हटले जाते. तर हे ही आधारच आहे, फक्त यात थोडा फरक आहे. तुमची आधार माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करण्यात आलेला नवा प्रयोग असे याला म्हणता येईल. यात काय असते की जेव्हा तुम्ही हे आधार डाउनलोड करता, तेव्हा त्यात एकूण १२ आकडी आधार क्रमांकापैकी फक्त शेवटचे ४ क्रमांक दिसतात, तर आधीचे ८ क्रमांक फुली मारलेले दिसतात.
यामुळे काय होईल? तुम्ही निवांत जिथे आधारची मागणी असेल तिथे आधार देऊ शकता. तुमची ओळखही पटेल आणि आधार क्रमांकही सुरक्षित असेल. आता हे मास्क्ड आधार डाउनलोड करणे पण खऱ्या आधार डाउनलोड करण्याइतकेच सोपे आहे. खाली सांगितल्याप्रमाणे केले तर दोन मिनिटांत ते डाऊनलोड होईल.
१) myaadhar.uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन लॉग इनवर क्लिक करावे.
२) तिथे आपला आधार क्रमांक आणि कॅपचा टाकून सेंड ओटीपी यावर क्लिक करावे. यासाठी आधार मोबाईल क्रमांकसोबत लिंक असावा.
३) आता तो ओटीपी टाकून लॉग इन करावे.
४) सर्व्हिस सेक्शनमध्ये जाऊन डाउनलोड आधार यावर क्लिक करावे.
५) तिथे review your demographics data नावाचे एक सेक्शन असेल. तिथे तुम्हाला मास्क्ड आधार हवे का असा प्रश्न असेल त्यावर क्लिक करा.
६) नंतर डाउनलोड यावर क्लिक करुन पीडीएफ स्वरूपात तुम्हाला मास्क्ड आधार मिळालेले असेल.
७) हे आधार पासवर्ड सुरक्षित असते. म्हणजे पीडीएफ ओपन करताना तिथे तुमच्या नावाचे पहिले चार इंग्रजी शब्द आणि जन्म दिनांक आणि महिना टाकावा लागतो. तोच तुमचा पासवर्ड असतो.
म्हणजे उदाहरणार्थ संदीप पाटील यांची जन्मतारीख १५ जून असेल तर त्यांचा डाउनलोड केलेले मास्कड आधारकार्ड उघडण्याचा पासवर्ड असेल: sandi1506
एखाद्या पब्लिक कॉम्प्युटरवर जर तुम्ही कधी आधार डाउनलोड केले असले तर तो डेटा डिलीट करावा. कुठे पॅन कार्ड किंवा कोणत्याही तुमची ओळख सांगणाऱ्या कागदपत्राची झेरॉक्स कुठे दिल्यास त्यावर सही करून ती कोणत्या कामासाठी आणि कुणाला दिली आहे (उदा. LIC साठी पॉलिसी मॅच्युअर झाल्याबद्दल)हे ही तिथे लिहावे.
थोडक्यात, ओळखीचा गैरवापर होऊ शकतो, तो टाळण्यासाठी जे शक्य असेल ते सर्व करावे.




