विवाह, फसवणूक अन् मिळालं खरं प्रेम!! क्रिकेटप्रमाणे कर्तिकच्या वैयक्तिक आयुष्यात देखील आले अनेक चढ उतार

दिनेश कार्तिकने आयपीएल २०२२ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडली. याच कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. ३ वर्ष संघाबाहेर राहिल्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. हे पुनरागमन त्याच्यासाठी खूप आहे, कारण वय वर्ष ३७ असताना भारतीय संघात पुनरागमन करणं खूप मोठी गोष्ट आहे. त्याची कारकीर्द अनेक चढ उतारांनी भरली आहे. क्रिकेट प्रमाणेच त्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.

दिनेश कार्तिकने २००७ मध्ये, वय वर्ष २१ असताना बालपणीची मैत्रीण निकिता वंजारा सोबत विवाह केला होता. निकिताचे वडील आणि दिनेश कार्तिकचे वडील हे दोघेही खूप चांगले मित्र होते. त्यामुळे दोघांच्याही कुटुंबीयांना असे वाटू लागले होते की, मैत्रीला नात्यात बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे योग्य वयात त्यांनी दोघांचं लग्न लावून दिले.

मात्र, लग्नाच्या ५ वर्षानंतर निकिताचे दिनेश कार्तिक वरील प्रेम कमी होऊ लागले होते. ती दिनेश कार्तिकचा मित्र आणि क्रिकेटपटू मुरली विजयच्या प्रेमात पडली होती. २०१२ मध्ये तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यातील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामना सुरू असताना कार्तिकला त्याच्या पत्नीचे मुरली विजयसोबत अफेअर असल्याची माहिती मिळाली. यानंतर कार्तिकने तिला घटस्फोट दिला होता.

कार्तिकने घटस्फोट दिल्यानंतर, निकिता आणि मुरली विजय यांनी लग्न केले आणि घटस्फोटाचे प्रकरण दोन्ही पक्षांनी अतिशय जलद आणि शांतपणे हाताळले. मुरली विजय आणि निकिता यांना आता ३ मुलं आहेत. प्रेमात फसवणूक झाल्यानंतर दिनेश कार्तिकला खरं प्रेम तेव्हा मिळालं जेव्हा त्याची भेट स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल सोबत झाली.

हे दोघेही एकाच प्रशिक्षकाकडून फिटनेस ट्रेनिंग घेत होते. दीपिकाला क्रिकेटपटू मुळीच आवडत नव्हते. तिचे असे म्हणणे होते की, त्यांना ज्या प्रकारची प्रसिद्धी मिळते ती इतर खेळाडूंपेक्षा जास्त आहे. दोघांमध्ये मैत्री झाली आणि दोघांनी एकमेकांना भेटायला सुरुवात केली. दोघेही एकमेकांना चांगलेच ओळखायला लागले. 

ऑगस्ट २०१५ मध्ये दोघेही विवाह बंधनात अडकले. त्यांनी दोन पद्धतीने विवाह केला होता. त्यांनी पारंपारिक ख्रिश्चन आणि हिंदू परंपरेने विवाह केला होता.दिनेश आणि दीपिका यांना कबीर पल्लीकल कार्तिक आणि जियान पल्लीकल कार्तिक अशी जुळी मुले आहेत. या जुळ्या मुलांचा जन्म १८ ऑक्टोबर २०२१ रोजी झाला होता.

सबस्क्राईब करा

* indicates required