computer

नवे ट्राफिक नियम काय आहेत समजून घ्या आणि पाळा.

प्रवास करताना किंवा रोजच्या रोज मोटरसायकल किंवा कार चालवत असताना वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असते. नियमबाह्य वर्तवणूक केली तर ट्रॅफिक दंडाचा फटका बसून खिशाला चांगलाच भुर्दंड बसतो. याचा अनुभव लोकांना वेळोवेळी येत असतो. अनेकवेळेस हेल्मेटसक्तीमुळे पण अनेकांना दंड भरावा लागला आहे. पण ट्रॅफिक नियम समजून न घेताच जर रस्त्यावर फिरले तर हेल्मेटअसून पण दोन हजार रुपयांचा फटका बसू शकतो. तो कसा ते समजून घेऊया.

मोटारसायकल चालवत असताना हेल्मेट आहे म्हणून निश्चित असण्याची गरज नाही. हेल्मेट आहे पण त्याची स्ट्रीप लावली नाही या एका कारणावरून तुम्हाला हजार रुपयांचा दंड बसू शकतो. मोटर व्हेईकल ऍक्ट १९४D नुसार तसा स्पष्ट नियम आहे. तसेच तुम्ही जर BIS नसलेला हेल्मेट वापरत असाल तर त्याच मोटर व्हेईकल ऍक्ट १९४D नुसार हजार रुपयांचा दंड आहे. म्हणजेच या दोन गोष्टी व्यवस्थित नसतील तर दोन हजार रुपये भरण्याची तयारी ठेवावी लागेल. 

दोन वर्षांपूर्वी सरकारने bureau of Indian standards (BIS) चे मानकांनुसार असलेले हेल्मेट भारतात दुचाकी गाड्यांसाठी तयार केले जावेत आणि विकले जावेत असे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने २०१८ साली दिलेल्या निर्देशानुसार लायटर हेल्मेट वापरले जावेत हे सुरक्षेसाठी गरजेचे असल्याचे म्हटले होते. तसेच सरकारकडून लहान मुलांना गाडीवरून घेऊन जाताना त्यांनाही हेल्मेट असणे बंधनकारक केले आहे. वेगपण ४० पेक्षा जास्त नसावा. तसेच हे नियम पाळले नाहीत तर हजार रुपयांचा दंड आहे. वरून ३ महिन्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स पण रद्द केले जाईल.

इतके वाचून टेन्शन आले असेल तर अजून पुढे वाचा. शेवटी आम्ही तुम्हाला नियमांबद्दल जागरूक करत आहोत. याच कायद्यानुसार जर तुमच्या गाडीत नियमापेक्षा अधिक वजन असेल तर २०,००० रुपये दंडाची तरतूद आहे. एवढेच नाही, तर गाडीत नेमून दिलेल्या वजनापेक्षा जितके जास्त टन वजन जास्त असेल तितका अधिक दंड आहे. प्रत्येक एका टन मागे २००० हजार दंड आहे. 

आता तुमच्या खात्यातून दंडाची रकम कापली गेली किंवा नाही, तसेच किती कापली गेली याची माहिती घ्यायची असेल तर echalan.parivahan.gov.in या वेबसाईटवर जाऊन चेक चलन स्टेटसवर क्लिक करावे. तुम्हाला चलन नंबर, व्हेईकल नंबर आणि ड्रायव्हिंग लायसन्स नंबर असे पर्याय दिसतील. यावर व्हेईकल नंबरवर क्लिक करून विचारलेली माहिती भरावी. नंतर get details वर क्लिक केले की समोर सर्व माहिती येईल. 

तुम्हाला जर ऑनलाइन चलन भरायचे असेल तर echalan.parivahan.gov.in याच साईटवर जाऊन कॅपचा आणि इतर माहिती भरावी. Get details वर क्लिक करून चलानची माहिती समोर आली की जे चलान भरायचे त्यावर क्लिक करावे. तिथेच पेमेंटचा पर्याय असेल ऑनलाइन पेमेंट करून ये कन्फर्म केले चलान भरले गेले असे समजावे. 
 

सबस्क्राईब करा

* indicates required