हे कोडे वाचायला १ मिनिट पण कोडे सोडवायचे आहे फक्त ३० सेकंदात!

काड्या करणं फार सोपं असतं. पण काड्या का केल्या याचं उत्तर देणं फारच कठीण असतं.
आज आम्ही बसल्या बसल्या एक काड्यांचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला उत्तर मिळालं. तुम्हाला किती सेकंदांत या कोड्याचं उत्तर देता येतं ते आता बघा. 
कोडं तसं सोपं आहे. तुमच्यासमोर एक इंग्रजी संख्या क्रम- 89537 मांडला आहे.
सुरुवातीला 8 हा अंक आहे. 
त्यातून एक काडी वगळली आणि 9 अंक तयार झाला.
अशाच क्रमाने एकेक काडी काढत किंवा हलवत 5, त्यानंतर 3 आणि शेवटी  7 पर्यंत पोहचलो. लक्षात घ्या, किती काड्या काढल्या किंवा जागा बदलून घेतल्या हे महत्वाचे नाही. उदाहरणार्थ, 5 पासून 3 बनवायला काडीची जागा बदलली आहे, 3 पासून 7 बनवायला दोन काड्या काढून टाकल्या आहेत.
आता तुम्हाला शेवटची संख्या कोणती असेल ते सांगायचं आहे.
यासाठी ३० सेकंदापेक्षा जास्त वेळ लागणार नाही.  जास्त वेळ लागलाच तरी कोण येतंय बघायला!!

उत्तर मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आणि हो, केवळ उत्तर देऊन भागणार नाही.  या संख्या-क्रमात काय तर्क लपला आहे ते पण सांगायचं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required