भारत - दक्षिण आफ्रिका टी -२० मालिकेत या ५ फलंदाजांनी केल्या आहेत सर्वाधिक धावा, यादीत ४ भारतीय...

ऑस्ट्रेलिया संघाला टी -२० मालिकेत धूळ चारल्यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ टी -२० मालिकेत आमने सामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी (२८ सप्टेंबर) तिरुवनंतपुरममध्ये पार पडणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. तसेच दोन्ही संघांमध्ये झालेल्या मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्मा सर्वोच्च स्थानी आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी -२० मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप -५ फलंदाजांच्या यादीत ४ भारतीय फलंदाज आहेत. पहिल्या स्थानी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने आतापर्यंत एकूण ३६२ धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानी सुरेश रैना आहे. सुरेश रैनाने आतापर्यंत एकूण ३३९ धावा केल्या आहेत. जेपी ड्यूमिनी हा टॉप - ५ खेळाडूंच्या यादीत एकमेव आफ्रिकन फलंदाज आहे. त्याने या मालिकेत २९५ धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा चौथ्या स्थानी आहे. विराट कोहलीने या मालिकेत २५४ धावा केल्या आहेत. तसेच शिखर धवनने या मालिकेत २३३ धावा केल्या आहेत.

तसेच रोहित शर्मा सध्या टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. रोहित शर्मा टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. त्याने १३९ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३६९४ धावा केल्या आहेत. तर विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराट कोहलीने १०७ सामन्यांमध्ये ३६६० धावा केल्या आहेत. रोहित शर्माने या फॉरमॅटमध्ये ४ शतके आणि २८ अर्धशतके झळकावली आहेत. तर विराट कोहलीने १ शतक आणि ३३ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच न्यूझीलंड संघातील फलंदाज मार्टिन गप्टील ३४९७ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये २ शतके आणि २० अर्धशतके झळकावली आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required