टी -२० WC स्पर्धेतील या फलंदाजांनी एकाच डावात मारले आहेत सर्वाधिक षटकार; पाहा यादी...

आगामी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये पार पडणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का? टी -२० विश्वचषक स्पर्धेतील एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कुठल्या फलंदाजाच्या नावे आहे? नाही ना? चला तर पाहुया टॉप -४ फलंदाज ज्यांनी टी -२० विश्वचषक स्पर्धेतील एकाच डावात सर्वाधिक षटकार मारले आहेत.

ख्रिस गेल (Chris Gayle) :

या यादीत पहिल्या स्थानी वेस्ट इंडिज संघातील दिग्गज क्रिकेटपटू ख्रिस गेलचे नाव आहे. त्याने २०१६ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात ४८ चेंडूंमध्ये नाबाद १०० धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने ५ चौकार आणि ११ षटकार मारले होते. या खेळीच्या जोरावर त्याने वेस्ट इंडिज संघाला सामना जिंकून दिला होता.

ख्रिस गेल:

या यादीत दुसऱ्या स्थानी देखील ख्रिस गेलचे नाव आहे. आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने २००७ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुध्द ५७ चेंडूंमध्ये ११७ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि १० गगनचुंबी षटकार मारले होते.

युवराज सिंग (Yuvraj Singh) :

षटकारांच्या बाबतीत युवराज सिंग मागे राहील असं होऊच शकत नाही. सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा युवराज सिंग या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. २००७ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत त्याने इंग्लंड विरुध्द झालेल्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सलग ६ षटकार मारले होते. या सामन्यात त्याने १६ चेंडूंमध्ये ५८ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि ७ षटकार मारले होते. या सामन्यात त्याने ३६२ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली होती. या सामन्यात त्याने सर्वात तुफानी अर्धशतक झळकावले होते. हा विक्रम आजवर कोणालाही मोडता आला नाहीये.

डेव्हिड वॉर्नर( David Warner) :

ऑस्ट्रेलिया संघातील सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने २०१० मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाविरुध्द फलंदाजी करताना ७२ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने २ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार मारले होते. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला ४९ धावांनी पराभूत केले होते.

काय वाटतं? आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत कुठला फलंदाज एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required