किंग कोहलीने सांगितले संघातील खेळाडूंचे मजेशीर किस्से; हार्दिक पंड्याचा किस्सा ऐकून खदखदून हसाल..

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. धावांचा पाऊस पाडत त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच संघाचे नेतृत्व करत असताना देखील त्याने भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. २००८ मध्ये भारतीय संघात पदार्पण केल्यापासून त्याने अनेक दिग्गज क्रिकेटपटूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर केला आहे. वर्तमान संघातील तो सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याला संघातील खेळाडूंचे काही सिक्रेट्स माहीत आहेत. आज आम्ही तुम्हाला विराट कोहलीने आपल्या संघ सहकाऱ्यांबद्दल शेअर केलेले काही सिक्रेट्स शेअर करणार आहोत.

मोहम्मद शमी (Mohammad shami

काही वर्षांपूर्वी विराट कोहलीने प्रसिध्द कॉमेडी शो 'कॉमेडी नाईटस विद कपिल'ला भेट दिली होती. या शो मध्ये कपिल शर्मा सोबत गप्पा मारत असताना त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास गोष्टी सांगितल्या. तसेच संघातील इतर खेळाडूंचे खळखळून हसवणारे किस्से देखील सांगितले. मैदानावर नेहमी आक्रमण असणारा विराट कोहली या भागात खळखळून हसवताना दिसून आला होता. या शो मध्ये जेव्हा विराट कोहलीला संघातील सर्वात आळशी खेळाडू बाबत प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी त्याने मोहम्मद शमीचे नाव घेतले होते.

रोहित शर्मा (Rohit Sharma

या शो मध्ये विराट कोहलीने वर्तमान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा देखील एक खास किस्सा सांगितला होता. रोहित शर्मा बाबत बोलताना विराट कोहलीने म्हटले होते की, "जिथे कोणी झोपण्याचा विचारही नाही करू शकत तिथेही रोहित शर्मा झोपू शकतो. मी आजवर कोणालाही इतकं झोपताना पाहिलं नाहीये. वेळेवर झोपला तरी उशिरा उठतो आणि उशिरा झोपला तरी देखील उशिरा उठतो.

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar pujara) :

विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा दोघेही खूप चांगले मित्र आहेत. गेल्या काही वर्षांपासून दोघेही एकत्र खेळत आहेत. चेतेश्वर पुजाराबद्दल बोलायचं झालं तर, शांत,संयमी आणि गोलंदाजांचा घाम काढणारा फलंदाज. चेतेश्वर पुजाराचा किस्सा सांगताना विराट कोहलीने म्हटले की," चेतेश्वर पुजारा, त्याच्यासारखा साधा भोळा माणूस मी आजवर पहिला नाही. नावच पुजारा आहे. दिवसातून ५ वेळेस पूजा करतो."

हार्दिक पंड्या (Hardik pandya

हार्दिक पंड्याचा किस्सा सांगताना विराट कोहली म्हणाला होता की, "हार्दिक पंड्याकडे आयपॉड आहे. त्यामध्ये सर्व इंग्रजी गाणे आहेत. त्याला या गाण्यातील एक शब्द सुद्धा माहीत नाहीये. गाणं गात असताना तो फक्त हलत असतो."

विराट कोहली हा केवळ मैदानावर आक्रमक भूमिकेत असतो. मात्र मैदानाबाहेर तो अनेकदा मस्ती करताना दिसून आला आहे. एक प्रश्न तुमच्यासाठी. विराट कोहलीचे टोपण नाव काय आहे ? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required