टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास बीसीसीआयचे हिरवे कंदील! मोठी बातमी आली समोर...

भारत - पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी आमने सामने आले नाहीये. इतकेच नव्हे तर आयसीसीची स्पर्धा खेळण्यासाठी देखील भारतीय संघ पाकिस्तानला जाण्यास तयार नव्हता. आगामी आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आता मोठा निर्णय घेऊ शकते.

२००८ पासून भारताचा पाकिस्तान दौरा रद्द..

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ सध्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आणि आशिया चषक स्पर्धेत आमने सामने येत असतात. २००८ नंतर भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन एकही द्विपक्षीय मालिका खेळली नाहीये. २००८ मध्ये जेव्हा भारतीय संघ पाकिस्तानात गेला होता, त्यावेळी दोन्ही संघांमध्ये दोन वनडे सामन्यांची मालिका पार पडली होती. ही मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त खाली होती.

भारतीय संघाला पाकिस्तानला पाठवण्यास बीसीसीआय तयार..

१८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत काही महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या जागी माजी भारतीय क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांची नियुक्ती केली जाऊ शकते. भारतीय संघाला २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत महिला टी -२० विश्वचषक स्पर्धा खेळायची आहे. त्यानंतर अंडर -१९ विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. आगामी आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानमध्ये पार पडणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतात वनडे विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे.

सरकारची घ्यावी लागणार परवानगी...

बीसीसीआय भारतीय संघाला पाकिस्तानला पाठवण्यास तयार आहे. मात्र यासाठी सरकारने हिरवे कंदील दाखवणे गरजेचे आहे. यापूर्वी जेव्हा पाकिस्तानमध्ये आशिया चषक पार पडणार होती, त्यावेळी बीसीसीआयने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. हेच कारण होते की, आशिया चषक स्पर्धा युएईत खेळवण्यात आली होती. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानला जाणार की नाही याबाबतचा निर्णय आता सरकार घेईल. मुख्य बाब म्हणजे बीसीसीआयचे सचिव जय शाह हे एशियन क्रिकेट काऊंसिलचे देखील अध्यक्ष आहेत. त्यामुळे स्पर्धचे आयोजन दुसऱ्या ठिकाणी करणे हे जय शाह साठी कठीण काम नक्कीच नसेल.

 काय वाटतं? भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required