आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट सहाव्या स्थानी विराजमान! पाहा टॉप -५ फलंदाज...

भारतीय संघाचा मुख्य फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. रविवारी पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ८२ धावांची तुफानी खेळी करत भारतीय संघाला जोरदार विजय मिळवून दिला. या खेळी दरम्यान त्याने अनेक मोठ मोठे विक्रम मोडले. यासह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला देखील मागे सोडले आहे. ८२ धावांच्या खेळीसह तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. राहुल द्रविडने २४,२०८ धावा केल्या होत्या. आता विराट कोहली राहुल द्रविडला मागे टाकत सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४७४ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ५३.८० च्या सरासरीने २४२१२ धावा केल्या आहेत. त्याने ७१ शतके आणि १२६ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच २६२ षटकार आणि २४०६ चौकार देखील मारले आहेत. अशीच खेळी करत राहिला तर तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो. चला तर पाहूया कोण आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप -५ फलंदाज...

)सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) :

मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जाणारा सचिन तेंडुलकर या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३४,३५७ धावा केल्या आहेत. या धावा त्याने ६६४ सामन्यांतील ७८२ डावांमध्ये केल्या आहेत. यादरम्यान त्याने १०० शतके आणि १६४ अर्धशतके झळकावली आहेत.

२) कुमार संगकारा (Kumar Sangakkara) :

श्रीलंका संघातील दिग्गज फलंदाज कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४६.७७ च्या सरासरीने एकूण २८,०१६ धावा केल्या आहेत. या धावा त्याने ५९४ सामन्यांतील ६६६ डावांमध्ये केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६३ शतके आणि १५३ अर्धशतके देखील झळकावली आहेत.

) रिकी पाँटिंग (Ricky ponting) :

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा सर्वोत्तम कर्णधाराचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला जाईल, तेव्हा रिकी पाँटिंग हे नाव सर्वोच्च स्थानी असेल. रिकी पाँटिंगने ५६० सामन्यांतील ६६८ डावांमध्ये २७,४८३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७१ शतके आणि १४६ अर्धशतके झळकावली आहेत. 

४) महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) :

महेला जयवर्धने हा देखील श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज आहे. त्याने अनेकदा श्रीलंका संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली आहे. तसेच त्याच्या फलंदाजी बद्दल बोलायचं झालं तर, त्याने ५१९ सामन्यांतील ६१७ डावांमध्ये २५,९५७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५४ शतके आणि १३६ अर्धशतके झळकावली आहेत.

) जॅक कॅलिस (Jacques Kallis) :

दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने अनेकदा दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५१९ सामन्यांमध्ये ४९.१० च्या सरासरीने २५,५३४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ६२ शतके आणि १४९ अर्धशतके झळकावली आहेत.

काय वाटतं? विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडू शकतो का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required