न्यूझीलंड आणि बांगलादेश विरुध्द होणाऱ्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा! पाहा कोणाला मिळाली संधी...


सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश संघाविरुद्ध दोन हात करणार आहे. नुकताच बीसीसीआयने या दोन्ही संघांविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या टी -२० आंतरराष्ट्रीय मालिकेत हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर रिषभ पंत कडे संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. तर याच संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेत देखील हार्दिक पंड्या संघाचे नेतृत्व करेल आणि उपकर्णधारपद रिषभ पंतकडे देण्यात आले आहे. 

तसेच भारतीय संघाला बांगलादेश संघाविरुद्ध वनडे आणि कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेत पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर संघाचे उपकर्णधारपद केएल राहुलच्या हाती देण्यात आले आहे. चला तर पाहूया न्यूझीलंड विरुध्द होणाऱ्या टी -२० मालिकेसाठी कसा आहे भारतीय संघ.

हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :

शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार, यष्टिरक्षक), शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (yashtirakshaka), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चाहर, कुलदीप सेन आणि उमरान मलिक.

बांगलादेश विरुध्द होणाऱ्या वनडे मालिकेसाठी या खेळाडूंना मिळणार संधी :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, यश दयाल.

बांगलादेश विरुध्द होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), केएस भरत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

तसेच जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत बोलताना मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी म्हटले की, "तो लवकरच पुनरागमन करेल. तो पुन्हा एकदा भारतीय संघासाठी खेळताना दिसेल. आम्ही टी -२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी त्याला परत आणण्यासाठी घाई केली आणि त्याचा काय परिणाम झाला हे तुम्ही पाहिलं. सध्या आम्ही त्याला परत बोलवण्यासाठी सावधगिरी बाळगतोय."

भारताची न्यूझीलंडविरुद्धची मालिका १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.  तर भारत आणि बांगलादेश हे ४ डिसेंबरपासून आमने सामने येणार आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required