ICC टी -२० WC २०२२ स्पर्धेत या फलंदाजांनी मारले आहेत सर्वाधिक षटकार! पाहा टॉप -५ फलंदाजांची यादी..

नुकताच आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धा संपन्न झाली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तान संघाला पराभूत करत दुसऱ्यांदा जेतेपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत एकूण ४५ रोमांचक सामने पार पडले. यादरम्यान अनेक असे फलंदाज होते ज्यांनी धावांचा पाऊस पाडला. तसेच अनेक असे गोलंदाज देखील होते ज्यांनी फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केल्यानंतर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणार यात काहीच शंका नाही. आज या लेखातून आम्ही तुम्हाला आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत. चला तर पाहुया टॉप -५ फलंदाज.

१) सिकंदर रजा:

झिम्बाब्वे संघाला वर आणण्यात सिकंदर रजाचा मोलाचा वाटा आहे. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी तो नेहमीच झिम्बाब्वे संघासाठी मोलाची भूमिका बजावत असतो. हीच चमकदार कामगिरी आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत देखील पाहायला मिळाली. त्याने आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारले. त्याने या स्पर्धेतील ८ सामन्यांमध्ये ११ षटकार मारले. या स्पर्धेत त्याने एकूण २१९ धावा केल्या.

२) कुसल मेंडिस:

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत श्रीलंकेच्या कुसल मेंडिसने झिम्बाब्वेच्या सिकंदर रजा नंतर सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. श्रीलंकेच्या या फलंदाजाने ८ सामन्यात १० षटकार ठोकले आहेत. तसेच या फलंदाजाने फलंदाजी करताना ८ सामन्यांमध्ये २२३ धावा केल्या.

३) ॲलेक्स हेल्स :

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज ॲलेक्स हेल्स तिसऱ्या स्थानी आहे. ॲलेक्स हेल्सने या स्पर्धेत एकूण १० षटकार मारले. तसेच फलंदाजी करताना त्याने एकूण २१२ धावा केल्या.

४) सूर्यकुमार यादव :

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत सूर्यकुमार यादवची बॅट जोरदार तळपली. सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानी आहे. सूर्यकुमार यादवने ६ सामन्यांमध्ये एकूण ९ षटकार मारले आहेत. यासह त्याने आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत एकूण २३९ धावा देखील केल्या.

५) अँड्र्यू बालबर्नी:

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आयर्लंडचा अँड्र्यू बालबर्नी पाचव्या क्रमांकावर आहे.  या खेळाडूने टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये एकूण ९ षटकार ठोकले.  याशिवाय या आयरिश खेळाडूने १५३ धावा देखील केल्या.

सबस्क्राईब करा

* indicates required