मार्शमॅलो थिअरी काय आहे ?

१९७० साली स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या वॉल्टर मिशेल या अभ्यासकानी एक प्रयोग केला.ते एका शाळेत लहान मुलांच्या वर्गात गेले आणि प्रत्येक मुलासमोर त्यांनी मार्शमेलो कॅण्डी ठेवली.सोबतच त्यांनी मुलांना सांगितलं की पुढची १५ मिनिटं या कॅण्डीला हात लावायचा नाही.१५ मिनिटं संपली की खायला हरकत नाही.इतकं सांगून ते वर्गाबाहेर निघून गेले.मार्शमेलो कँडी त्या काळातली मुलांची आवडती कॅण्डी होती.इकडे त्यांची पाठ वळली आणि पोरांमध्ये चुळबुळ सुरु झाली.सगळेजण एकमेकांकडे आणि समोरच्या कँडीकडे बघत बसले.काही मिनिटं गेली आणि एका पोरानं कँडी उचलून खाऊन टाकली.मग दुसर्‍यानेही तेच केलं.मग आणखी एकानी ...

असं होता होता १५ मिनिटानी वॉल्टर मिशेल पुन्हा वर्गात आले तेव्हा बहुतेक पोरांनी कॅण्डी गट्ट केली होती,अपवाद फक्त सात मुलांचा ! या मुलांनी कॅण्डीला हातही लावला नव्हता.त्यांनी या मुलांची नावं एका यादीत आणि इतर मुलांची दुसर्‍या यादीत लिहून ठेवली.मध्यंतरात काही वर्षं गेली आणि त्यांनी ही मुलं आता काय करतायत हे तपासायला सुरुवात केली.ज्यांनी १५ मिनिटाची सूचना तंतोतंत पाळली होती ती मुलं आता मोठमोठ्या कंपन्यांमध्ये टॉप पोझिशनला होती.त्यांचं लाईफ सेट झालं होतं. ज्या मुलांना कॅण्डी खायचा मोह आवरता आला नाही ती मुलं अजूनही धडपडतच होती किंवा सर्वसाधारण आयुष्य जगत होती.या निरिक्षणावरून एक त्यांनी एक थिअरी मांडली ती अशी जे लोक संयम पाळू शकतात ते आयुष्यात यशस्वी होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते.थोडक्यात संयम ही यशाची एक पायरी असते !

****

आता ही थिअरी १००% लागू पडतेच असंही नाही. काही अभ्यासकांच्या मते कॅण्डी खाण्याचा किंवा न खाण्याचा निर्णय त्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आर्थिक स्तरावरही अवलंबून होता.ज्यांना कॅण्डी सहज मिळत होती त्यांच्या संयमाला अधिक बळ होतं. त्याखेरीज हा निर्णय त्या मुलांच्या घरच्या शिस्तीचाही भाग होता.

असे असले तरी संयम ही यशाची एक पायरी यात काही शंका नाही.मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ही थिअरी नकळत वापरली जाते हे बर्‍याचजणांना माहिती नसेलही. उदाहरणार्थ : ज्या कंपन्यांमध्ये कर्मचार्‍यांना ऑफीस खर्चासाठी वेगळे क्रेडिट कार्ड देते त्यांच्या खर्चाच्या पॅटर्नचा अभ्यास करून नंतरच त्यांना दिल्या जाणार्‍या आर्थिक जबाबदार्‍यांचा विचार केला जातो.

****

तुमचे काही वेगळे निरिक्षण असेल तर ते नक्की आम्हाला सांगा

सबस्क्राईब करा

* indicates required