हा चक्क चार महिन्यांचा गरोदर आहे?
हेडेन क्रॉस हा इंग्लंडमधला तरुण चक्क गरोदर आहे आणि त्याच्या पोटात चार महिन्यांचं बाळ आहे!! या तरूणाची कहाणीच विचित्र आहे. तर आधी हा जन्माने मुलगी होता. मग त्याला वाटलं की लिंगबदल करून पुरुष व्हावं. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणं हार्मोन ट्रीटमेंट घेतल्यावर या हेडेन क्रॉसचं रुपांतर पुरुषात झालं आणि तो कायद्याने पुरुष असल्याची सरकारी कागदपत्रात नोंदसुद्धा झाली. हे बाईचा बुवा होणं काही वाटतं तितकं साधं-सरळ-सोपं नाही. त्यासाठी नंतर स्तन आणि गर्भाशयपण काढून टाकावं लागतं. तर ही सगळी प्रक्रिया सुरू असताना हेडेनला अशी इच्छा झाली की आपण पूर्ण पुरुष होण्याआधी आपली बीजांडं सुरक्षित ठेवावी. त्यासाठी त्यानं कायदेशीर परवानगीसाठी कोर्टात अर्जही केला. पण त्याच्या दुर्दैवानं कोर्टानं यासाठी परवानगी काही दिली नाही. मग त्यानं इंटरनेटवर योग्य अशा दात्याची शोधाशोध केली आणि असा दाता पण मिळाला. गेल्याच महिन्यात " आपल्याला दिवस गेले असून, चौथा महिना चालू असल्याची" घोषणा हेडेन क्रॉसनं केली आहे. पण जर का कोर्टानं या हेडेन क्रॉसला अशी परवानगी दिली असती तर तो बाळाचा पूर्णपणे आई आणि बाबा दोन्हीही झाला असता नाही?




