'बाहुबली २' चं नवं मोशन पोस्टर पाहिलंत का ?

Subscribe to Bobhata

बाहुबली २ च्या प्रत्येक पोस्टरगणिक सिनेमाची उत्सुकता वाढतेय.  बाहुबलीच्या पहिल्या भागातील प्रभासचं शिवलिंग उचललेलं पोस्टर असेच काहीसं उत्कंठा वाढवणारं होतं. आता मात्र बाहुबली २ च्या या नव्या पोस्टरनं उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पोस्टरवरून सिनेमात काहीतरी ’हटके’ पाहायला मिळणार यात शंका उरत नाही.

फिल्मचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी महाशिवरात्रीच्या निमित्तानं फिल्मचं पोस्टर ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केलं.  त्यानंतर काही तासांतच ६२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पोस्टर लाईक केलं, तर २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पोस्टरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावरूनच लोकांच्या उत्सुकता किती ताणल्या गेल्या आहेत हे कळते.

या नव्या पोस्टरमध्ये बाहुबली एका महाकाय हत्तीच्या सोंडेवरून माथ्यावर जाताना दिसत आहे. या आधीच्या पोस्टरमध्ये बाहुबली आणि त्याची पत्नी महाराणी देवसेना दिसत होते.

सबस्क्राईब करा

* indicates required