अमिताभने घेतला हर्ष भोगलेचा बळी?
आय. पी. एल. च्या मुंबई इंडियन्स सोबतच्या पहिल्या सामन्यात एक ओळखीचा आवाज आणि चेहरा होता गायब तो म्हणजे हर्षा भोगलेचा. IPL 9 सुरु होण्याच्या काही दिवस आधीच BCCI ने अचानक त्याचे कॉंन्ट्रॅक्ट कोणतीही पूर्व कल्पना न देता रद्द केले.
भारतीय क्रिकेटचा आवाज अशी ओळख गेली दोन दशके ओळख असणारा हर्षा हा IPLच्या पहिल्या पर्वापासून कॉमेंट्री टीमचा भाग आहे. त्यालाही साधारण एका आठवड्यापूर्वी या निर्णयाची कल्पना देण्यात आली. बीसीसीआयने अधिकृतरित्या या विषयावर व्यक्तव्य करण्यास नकार दिला. पण हर्षाला ICC World T20 मध्ये भारत बांगलादेश सामन्यात केलेलं बांगलादेशच्या खेळाडूंचे कौतुक भोवलं असण्याची चर्चा आहे. या सामन्यानंतर महाअभिनेता Big B याने ट्विटरवर हर्षाचे नाव न घेता “ भारतीय समालोचकांनी भारताच्या खेळाडूंबद्दल जास्त बोलावे” अशी अपेक्षा व्यक्त केली होती. भारतीय संघाचा कर्णधार धोनीने सुद्धा त्यास अनुमोदन दिले होते. त्यावर हर्षाने फेसबुकवर सविस्तर आपली बाजू मांडली होती. या कारणास्तव जर हर्षाचा बळी गेला असेल तर ते खरोखरच दुर्दैवी असेल.
अमिताभ ने केलेलं ट्विट
T 2184 - With all due respects, it would be really worthy of an Indian commentator to speak more about our players than others all the time.
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 23, 2016
त्यावर हर्षा ने दिलेले उत्तर
I must confess to being a bit taken aback by the intensity of the criticism yesterday over the question of focussing...
Posted by Harsha Bhogle on Thursday, March 24, 2016
या बाबतीत भारताच्या नागपूर येथील सामन्यात हर्षा आणि विदर्भ क्रिकेट असोसेशीयनच्या एका पदाधिकार्याशी झालेला वाद हे अजून एक कारण असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. BCCI चे सध्याचे अध्यक्ष शशांक मनोहर हे नागपूरचे राहणारे आहेत हाही एक योगायोगच.
सुनील गावस्कर पाठोपाठ हर्षा भोगलेचा आवाज आता नसणार याबाबतचा रोष लोकांनी ट्विटरवर व्यक्त केला. त्यामुळे हर्षा भोगले आज दिवसभर ट्रेंड करत होते. एकूणच सचिन, राहुल, सौरव यांच्या रिटायरमेंटनंतर त्या पिढीतील सर्वांचे लाडके कॉमेंट्रेटर एक एक करून जावयास लागल्यास क्रिकेटमध्ये रस उरणे कठीणच. आता त्या सिद्धूची ठोको टाळी छाप कॉमेंट्री ऐकणेच आपल्या नशिबात आहे.




