शिनिमात दिसतं येक आणि आमचं असतं येक! तुमी बी आसलीच होळी खेळता का??

ती पिच्चरमंधी लय ग्वाड ग्वाड दाखवित्यात मायला. हिरो हिरोईन्या अंगाला कलर लावून बी काय झगामग दिसत्यात देवा रे देवा!! तो हिरो चिकन्या हिरोईनवर पानी काय टाकतो, तिला रंगवतो काय अन ती बी त्याला लाईन देते म्हणा. भांग पिवून बी सुरात गानं म्हणत्यात ते लोक. आता असलं बघितल्यावर आम्ही पण म्हटलं असाच ट्राय मारून बगू. लॉटरी लागली तर गावातली रेखा पटेल ना राव आपल्याला. एकदम हवा होईल गावात. पण कसलं काय ते पिच्चर मधलं येगळं आणि हे येगळं असतंय ना गड्या...
आता काय म्हणून काय इचारताय? तुमीच बघा काय फरक अस्तुय तो...
तुमी बी आसलीच होळी खेळता का ?