व्हिडिओ- सिलिंडरला आग लागली तर? विझवणं खूप सोपं आहे

Subscribe to Bobhata

वेळ काही सांगून येत नाही. घरात त्यामुळं छोटे-मोठे अपघात घडत असतात. कापण्या-खरचटण्यापर्यंत ठीक आहे, पण आग-बिग लागली तर घाबरून जायला होतं. घरातल्या माणसांचा जीव वाचवणं हे आधी महत्वाचं. पण ती आग पसरली तर आपल्या आणि शेजारच्या, सगळ्यांच्या घराचं नुकसान पण होतं.

शॉर्ट सर्किट आणि स्वयंपाकघरातले सिलिंडर हे घरी आग लागण्याचं मुख्य कारण. आजकाल शहरांमधून पाईप गॅस आलेत पण बर्‍याचशा गावांत अजून ते पोचले नाहीत. त्यामुळं हा लेख वाचावाच लागेल.

या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणं कधी रेग्युलेटरमधून गॅस लीक होऊन आग लागू शकते. कधी कधी गॅसचा पाईप किती जुना झालाय याकडे आपलं लक्ष राहात नाही आणि त्या नळीला भोकं पडतात. त्यामुळंही गॅस लीक होतो आणि आग लागू शकते. यावरचा उपाय अगदी साधा सोपा आहे. पटकन बेडरूममध्ये जाऊन एक बेडशीट घ्या, तिला पाण्यात भिजवा आणि ती ओली बेडशीट पूर्ण सिलिंडरला गुंडाळा. आग तात्काळ विझेल.

या ओल्या चादरीनं आपल्याला सिलिंडर वरून आणि सर्व बाजूंनी झाकायचा आहे. त्यामुळं आगीला हवा मिळणार नाही आणि ती तात्काळ विझून जाईल. हे तुम्हां-आम्हांलाही करणं सहज शक्य आहे. जर व्हिडिओ नीट पाहिला तर बाजूला उभ्या असणार्‍या प्रेक्षकांना बोलावून त्यांनाही ही आग कशी विझवायची हे या पोलिसांनी दाखऊन दिलं आहे.

कुणाच्या घरी असा प्रसंग न येवो हीच आपली सगळ्यांची इच्छा असली तरी अशा प्रसंगांसाठी तयार असणं वाईट नाही, नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required