मासिक पाळीत तुम्हाला पोटदुखीचा त्रास होतो? हा उपाय तुमच्या वेदना दूर करू शकेल.

स्त्रियांसाठी महिन्याचे ते चार दिवस कोणत्याही औषधाशिवाय सुखकर होऊ शकतात असं म्हटलं तर त्यापेक्षा अधिक आनंददादायक बातमी नसेल.

इस्त्रायलचे   झ्वी नचम (Zvi Nachum) आणि  शेन नचम (Chen Nachum) हे दोघे पिता-पुत्र घेऊन आले आहेत लिव्हिया नावाचं उपकरण जे ओटीपोट, पाठ किंवा मनगट असं कुठेही बांधता येईल.   हे बॅटरीवरती चालणारं यंत्र  एकदा चार्ज केल्यानंतर साधारण 15 तास चालतं. मासिक पाळीच्या वेदना निर्माण  करणारी एक नस स्त्रियांच्या शरीरात असते. त्या नसेला हे उपकरण सिग्नल पाठवून व्यग्र (बिझी) ठेवतं. त्यायोगे ती नस वेदना निर्माण करत नाही.


हे फक्त मासिक पाळीवरच्याच वेदनांवरती नाही तर बऱ्याचशा अंगदुखीच्या तक्रारींवर उपाय ठरू शकते.

सबस्क्राईब करा

* indicates required