'RAW' बद्दल माहिती असाव्यात अश्या २० गोष्टी !!!

रिसर्च अँड अॅनलीसीस विंग अर्थात ‘रॉ’ (RAW) ही गुप्तचर संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर गुप्तपणे काम करत असते. तिचे एजंट आपल्यातलेच एक बनून हेरगिरी करत असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही महत्वाच्या घडामोडींवर त्यांची नजर असते. अतिरेकी हल्ले, युद्ध यांची अप-टू-डेट माहिती काढण्याचं काम RAW करते.
सर्वसामान्य माणसाला तसं या RAW एजन्सीबद्दल कमीच माहीत असतं आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत RAW बद्दल माहित नसलेल्या या २० गोष्टी :
१. RAW चं बोधवाक्य त्यांच्या कामाबद्दल बरीच माहिती देऊन जातं. ‘धर्मो रक्षति रक्षित:’ म्हणजे जी व्यक्ती धर्माच रक्षण करते तीच व्यक्ती सुरक्षित राहते. या संदेशातला धर्म हा शब्द देशाला उद्येशून वापरला गेला आहे
२. RAW ची स्थापना भारत-चीन युद्ध (१९६२) आणि भारत पाकिस्तान (१९६५) युद्धानंतर २१ सप्टेंबर १९६८ साली झाली. युद्धानंतर देशाच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवल्यामुळे इंदिरा गांधी सरकारच्या कारकिर्दीत RAW ची स्थापना करण्यात आली.
३. RAW ला RTI (माहितीचा अधिकार) कायदा लागू होत नाही, कारण हा देशाचा प्रश्न आहे.
४. RAW ची कायदेशीर स्थिती अजूनही अस्पष्ट आहे. RAW ही कोणतीही संस्था नसून एक विंग आहे.
५. RAW ने एकदा ISI या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा डाव त्यांच्यावरच उलटवला होता.
६. कोणत्याही परिस्थितीत RAW भारतीय संसदेला उत्तर देण्यास बांधील नाही. RAW आपला रिपोर्ट थेट पंतप्रधानांना देते. RAW च्या संचालकाची निवड सेक्रेटरी (रिसर्च) द्वारा केली जाते.
७. RAW मध्ये सामील होणाऱ्या प्रत्येकास आपल्या पूर्वीच्या कामाचा राजीनामा द्यावा लागतो, जेणेकरून ती व्यक्ती फक्त RAW साठीच काम करेल.
८. एजंट होण्यासाठी मिळणारी ट्रेनिंग वर्षभर चालू शकते. यात बेसिक ट्रेनिंग आणि अॅडवान्स ट्रेनिंग असे दोन भाग असतात.
९. RAW च्या ऑफिसरला अमेरिका, यूके आणि इस्राईल मध्ये ट्रेनिंग दिली जाते. ट्रेनिंग दरम्यान एजंटला ‘क्राव मागा’ या खास स्वसंरक्षण पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते तसेच तांत्रिक साधनांचे ज्ञान दिले जाते.
१०. तुम्हाला जर RAW एजंट बनायचं आहे तर सर्वात आधी तुमचे आई वडील भारतीय असायला हवेत !
११. सिक्कीम राज्याला भारतात सामील करण्याच श्रेय RAW एजन्सीलाच जातं.
१२. तुम्ही जर कोणत्याही एका खेळात पारंगत असाल आणि चीनी, अफगाणी, उर्दू, इंग्रजी या भाषांच चांगलं ज्ञान असेल तर तुमचा RAW एजंट बनण्याचा मार्ग सोप्पा होऊन जातो.
१३. RAW ऑफिसर होण्याचा सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे आधी तर तुम्ही लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास होऊन IAS आणि IFS पदावर कार्यरत व्हा !!!
१४. RAW मध्ये काम करायचं असल्यास दिवसाचे चोवीस तास, आठवड्यातील सातही दिवस, बारा महिने सतत काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे.
१५. जर तुम्ही RAW चे गुप्तहेर असाल आणि तुम्ही दुसऱ्या देशात हेरगिरी करताना पकडला गेलात तर सर्व प्रथम तुमचा देशच तुम्हाला आपलं नागरिक मानण्यापासून नकार देईल. शेवटी तुमचा मृत्यू एखाद्या परकीय देशात होऊ शकतो.
१६. कारगिल युद्धात पाकिस्तान सामील असल्याचा पुरावा RAW नेच दिला होता !
१७. RAW एजंटने एवढं गुप्त असलं पाहिजे कि त्याला RAW एजंट व्हायचंय हे देखील त्याने कुणाला सांगता कामा नये.
१८. २००८ मध्ये झालेल्या मुंबई अतिरेकी हल्याची माहिती RAW कडे होती पण अंतर्गत समन्वय नसल्याने ती माहिती पोहोचू शकली नाही.
१९. RAW एजन्सी इतकी गुप्त आहे की त्याच्या कामाची माहिती सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचत नाही.
२०. शेवटचं म्हणजे सिनेमात दाखवण्यात येणारा RAW एजंट आणि खऱ्या आयुष्यतील RAW एजंट यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.