computer

सैराट जर या दिग्दर्शकांनी बनवला असता तर?

फेसबुकवरचे सौरभ पाटील घेऊन आले आहेत ’सैराट’ वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या नजरेतून.  सैराटने सगळ्यांनाच झिंग दिली आहे, मग पाटीलसाहेब तरी कसे मागे राहतील?

महेश कोठारे

आर्ची म्हणजेच गंगू ही कवठयामहांकाळची पोरगी एका दिवशी साध्या-भोळ्या परश्या हवालदाराच्या प्रेमात पडते. या लग्नाला आर्चीचा बाप म्हणजे कवठ्याचा विरोध असतो. तो दोघांना पकडून हैद्राबादच्या एका खाणीमध्ये घेऊन जातो. शेवटी इन्स्पेक्टर महेश ज्याधव खाणीच्या वरुन उडी टाकून दोघांना वाचवतात.

संजय लीला भन्साळी

अर्चनाराणी या राजस्थानच्या राणी आहेत तर परशुराम हा त्या राज्याचा सेनापती. अर्चनाराणी आपल्या मैत्रिणींबरोबर राजदरबारात "मैं तो झिंगाट.. मैं तो झिंगाट.... मैं तो झिंगाट हो गईं" या गाण्यावर नाचतात. राजा भानुप्रतापसिंग यांना अर्चनाराणीचे प्रेमसंबध दोनशे किलो जिलेटीन कागदाच्या सेटमधून पण दिसतात. शेवटी महाराज आपल्या मुलीला तिच्या पाचशे किलोच्या घागऱ्यासह पाचशे किलो घोटीव कागदात आणि तीनशे किलो रंगीत जिलेटीन पेपरमध्ये गुंडाळून मारतात.

राम गोपाल वर्मा

परश्या दक्षिणेतून मुंबईत स्वतःचं नशीब आजमावयाला आलाय. पहिला अर्धा तास परश्याचे फक्त बुट दिसतात. आर्ची पावसात भिजताना परशाला दिसते आणि तो प्रेमात पडतो. पुढे मुंबईसारख्या शहरात हे रोज एकाच बस स्टाॅपवर भेटतात. (तेव्हा बसच्या टायरमध्ये कॅमेरा बसवलेला असतो). पण परश्या कधीच मुंबईचा मोठ्ठा डाॅन लंगड्याचा डावा हात झालेला असतो. लंगड्या मुंबईच्या कमिशनरला मारायची सुपारी परश्याला देतो. परश्या कमिश्नरच्या घरात शिरतो, बंदुक ताणतो.. इतक्यात भिंतींवर त्याला आर्चीचा गजरा घातलेला फोटो दिसतो. काय परश्या गोळी चालवेल? उत्तरासाठी पहा ’राम गोपाल वर्मा की सैराट’.

सूरज बडजात्या

अर्चनाचे वडील वीस वर्षांपूर्वी बिझनेसमुळे इंडियाच्या बाहेर आहेत. घरातील लग्नामुळे ते अर्चना आणि अर्चनाची आई रिमा लागू यांना घेऊन राजस्थानमधल्या त्यांच्या हवेलीत येतात. तिथे प्रशांत जो सध्या केंब्रिज मध्ये शिकतोय आणि त्यांची इंडियात मोठ्ठी शिपिंगची कंपनी आहे तो आलेला असतो. तेव्हा प्रशांत "ऐ तो सच हैं कि झिंगाट हैं..." गाणं एक हात खिशात घालून म्हणतो. अर्चनाला तो आवडत असतो. मात्र अर्चनाचे वडील हे प्रशांतचे मामाच असतात आणि प्रशांतच्या वडिलांमुळे झालेल्या बिझनेस लाॅसमुळे त्यांनी इंडिया सोडलेला असतो. शेवटी प्रशांतचे वडील, साक्षात बाबूजी येतात आणि माफी मागतात.

रोहित शेट्टी

शेवटी अर्चना आणि प्रशांत उडणाऱ्या टाटा सुमोत बसुन दूर निघुन जातात.

सबस्क्राईब करा

* indicates required