फॅशन डिझाईनरने टिपलं खरं सौंदर्य...चक्क एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला बनवलं मॉडेल!!!

आपल्यापैकी कोणत्या मुलीला किंवा महिलेला मॉडेल व्हावसं वाटत नाही?  प्रत्येकीला वाटतंच ना?  मस्त वेगवेगळे ड्रेसेस घालून मिरवणं कोणत्या मुलीला आवडणार नाही बरं? बघा हं, अशीच एखादी संधी तुम्हाला मिळाली तर? अहो, थट्टा नाही काही... हे खरंय !....एक घरगुती काम करणारी महिला चक्क मॉडेल बनलीये....

मनदीप नागी या दिल्लीतल्या एका फॅशन डिजाईनरनं आपल्या डिझाईन्सच्या प्रदर्शनासाठी मॉडेलच्याऐवजी चक्क एका घरगुती काम करणाऱ्या महिलेला आपलं मॉडेल बनवलं. मनदीप नागी यांच्या शेजाऱ्यांकडे घरगुती कामात मदत करणारी ‘कमला’ (बदललेले नाव) हीच आपल्या डिझाईन्सला न्याय देऊ शकते असं नागी यांना वाटलं. त्यांना खऱ्याखुऱ्या मॉडेल्सबरोबर काम करण्यात काहीही रस नाही.  पण त्यांना खऱ्या सौंदर्याबरोबर काम करण्याची आवड आहे असं मनदीप यांचं मत आहे.

मनदीपने निवडलेली कमला ही चक्क दोन मुलांची आई आहे. आणि ती आपल्या उपजीविकेसाठी दिल्लीत  घरगुती काम करते.  मनदीप नागींनी कमलाला मॉडेल बनण्याची ऑफर दिली. पण माहिती आहे, ही  कल्पना कमलाला मान्य करायलाच एक दिवस लागला.  सुरुवातीच्या दिवसांत या फोटोशूटच्या  कामात तिला खूपच विचित्रसुद्धा वाटलं. आता तुम्हीच विचार करा, घरगुती काम करणार्‍या कमलासाठी हे किती वेगळं काम होतं!  साहजिकच नक्की काय आणि कसं करावं  हे तिला समजत नव्हतं.  पण हळूहळू कमलाने त्या कामाशी जुळवून घेतलं.

सर्व फोटो स्रोत

कॅमेरा आणि तिची वेगळीच गट्टी जमली आणि तिलासुद्धा तिच्या सौंदर्याची खूण पटली. मेकअप आणि हेअरस्टाइल ह्यात तिने स्वतःचीच प्रगती होताना पाहिली. त्यानंतर कमलाला आत्मविश्वास आला.  ह्या आत्मविश्वासाच्या आणि तिच्या निखळ सौंदर्याच्या मदतीने नागी यांच्या कामाला दाद मिळाली. एका प्रोफेशनल मॉडेलप्रमाणं कॅमेऱ्याशी खेळत तिनं ही लढाई जिंकली असंच म्हणता येईल. खरं सौंदर्य हे बघाणाऱ्याच्या नजरेत असतं.  ते सृष्टीत नाही तर आपल्याच दृष्टीत लपलेलं असतं हे मनदीप नागी यांनी सिद्ध केलंय!!

 

लेखिका : संयुक्ता पेनुरकर.

सबस्क्राईब करा

* indicates required