नोकरी मिळवण्यासाठी अभिषेक बच्चन देतोय SSC ची परिक्षा !!

महानायक अमिताभ बच्चन यांच्या कर्तृत्वाचा डंका जगभरात पीटत असला तरी त्यांच्या सुपुत्राची मात्र लोकांकडून सतत टर उडवली जाते राव. अभिषेकची अ‍ॅक्टींग, त्याचे सुमार चित्रपट, त्याचं अपयश, या सगळ्यावर बरेच विनोद सोशल मिडीयावर फिरताना दिसतात. आताही काहीसं असंच गंमतीदार घडलंय... 

स्त्रोत

SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमीशन कडून देशभरात मल्टी टास्कींग स्टाफसाठी परिक्षा घेण्यात येतायत. यातील पहिला टप्पा गेल्या रविवारी पार पडला. आश्चर्य म्हणजे या परिक्षेसाठी चक्क अभिषेक बच्चनचा अर्ज आला होता !! अर्थातच कोणीतरी गंमतीने अभिषेकचं नाव आणि फोटो टाकून हा फॉर्म भरला असणार. पण गंमत म्हणजे कर्मचारी भरती आयोगाकडून कोणतीही चाचपणी न करता अभिषेकच्या नावाने अॅडमीट कार्ड जारी करण्यात आलं. यावर अभिषेकचा रोल नंबर आणि जोधपुरचा अड्रेसही आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required