महिलांच्या ड्रेसला १८ व्या शतकापासून या कारणामुळे खिसे नाहीत !!

मंडळी, स्त्रियांकडून एक तक्रार नेहमी केली जाते ती म्हणजे स्त्रियांच्या कपड्यांना खिसे का नसतात. साडीला खिसे असणं शक्यच नाही पण इतर प्रकारच्या कपड्यांना सुद्धा खिसे नसतात. आणि जर असले तरी फक्त नाममात्रच असतात. या खिशांमध्ये पैसे आणि छोट्यामोठ्या गोष्टींशिवाय काहीच राहू शकत नाही. आता प्रश्न पडतो स्त्रियांच्याच बाबतीत असं का ? मंडळी, स्त्रियांच्या कपड्यांना असलेल्या खिश्यांच्या मागे मोठा इतिहास आहे. फक्त इतिहास नाही तर राजकीय इतिहास आहे भौ !!

स्रोत

तर, हे सर्व सुरु झालं युरोपात. त्याकाळी युरोपातील लोकांच्या कपड्यांना (स्त्री असो वा पुरुष) खिसे नसायचे. खिश्यांच्या जागी त्यांना एक पाऊच सोबत ठेवावा लागायचा. पुढे १६०० च्या दरम्यान पुरुषांच्या कपड्यांना आतल्या बाजूने खिसे तयार करण्याची पद्धत सुरु झाली. ‘मेल क्लोदिंग’च्या इतिहासात हा महत्वाचा निर्णय होता. पुढे ही फॅशन प्रचंड लोकप्रिय झाली. एवढी की खिश्यांना ‘मर्दानी’ मानलं जाऊ लागलं.

स्रोत

महिलांच्या बाबतीत हा बदल १७ व्या शतकात घडला. त्याकाळी युरोपियन समाजात ‘हूप स्कर्ट’ची फॅशन आली होती. हूप स्कर्ट काय असतो ते तुम्ही वरील फोटो मध्ये पाहू शकता. हा झग्या सारखा प्रकार असल्या कारणाने कपड्याच्या आतल्या बाजूला एक पाऊच किंग लहान बॅग लपवता येण्यासारखी व्यवस्था असायची. ही फॅशन जरा विचित्रच आहे. पण महिल्यांच्या कपड्यांच्या आत पहिल्यांदा खिशा सारखा कप्पा आला होता. अशी फॅशन पुढे जाऊन युरोपी महिलांची ओळख बनली.

मग काळ आला अशा कपड्यांचा ज्या कपड्यांचा उद्द्येश महिलांना फक्त स्लिम-ट्रिम ठेवण्याचा होता. अशा कपड्यांमध्ये खिसा ठेवण्याचा विचारही होऊ शकत नव्हता कारण खिसे असले म्हणजे त्यात काही तरी ठेवलं जाणार आणि महिलांची सुंदरता बिघडणार. याच विचाराने पुढे जाऊन खिसे फक्त पुरूषांपुरते मर्यादित राहिले. आजच्या लेडीज शर्टला खिसा नसतो तो याच कारणाने.

स्रोत

महिलांचे कपडे हे सुंदरतेच्या हुशोबाने बनवले जायचे. म्हटलं तर याला पुरुषी मानसिकता म्हणू शकतो किंवा भंपक फॅशन. काही का असेना पण हा ट्रेंड आला खरा. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात एका नवीन गोष्टीचा शोध लागला. तो म्हणजे ‘शॅटलेन’. खालील फोटो मध्ये हा काय प्रकार आहे हे तुमच्या लक्षात येईल.

स्रोत

‘शॅटलेन’ हा आजच्या किचेन चा खापर पणजोबा. ‘शॅटलेन’ म्हणजे रोजच्या वापरातील उपयुक्त वस्तूंचा संच. हा संच छोट्या व्हर्जन मध्ये मिळत असे, जो सोबत ठेवायला अगदी सोप्पा होता. भारतात जशा प्रकारे कमरेला चावी अडकवण्याची पद्धत आहे तशीच ही पद्धत होती. ‘शॅटलेन’ त्याकाळातील युरोपीय उच्चभ्रू स्त्रियांचं आभूषण होतं.

अगदी चाकू पासून ते, लहानशी वही, पेन, सुई इत्यादी यात राहत असे. पाहिजे तशा डिझाईन मध्ये मिळत असल्याने ते आकर्षकही होतं. असं म्हणतात की यामागील मूळ प्रेरणा ही फ्रेंच राज्यक्रांतीत होती. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात तर एक म्हण प्रसिद्ध होती : “ज्या महिला आपल्या वस्तू लपवण्यात सक्षम नसतात त्यांच्या हातून क्रांती घडणं अशक्य आहे.”

स्रोत

एकीकडे हे होत असताना १८०० च्या काळात लंडन मध्ये रॅश्नल ड्रेस सोसायटीची स्थापना झाली. या सोसायटीने तद्दन सुंदरतेच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या कपड्यांना विरोध केला. त्याकाळात मोठं राजकारण पेटलं होतं. यातूनच महिलांसाठी ‘Suffragette suit’ तयार करण्यात आले. या सूट मध्ये कधी नाही ते तब्बल ६ खिसे होते. हा सूट त्याकाळात गाजला.

स्रोत

स्रोत

खिसे असलेल्या कपड्यांचा ट्रेंड पुढे दुसऱ्या महायुद्धापर्यंत स्थिर राहिला. पण महायुद्ध संपलं आणि स्कर्टचा ट्रेंड आला. पुढे हळू हळू खिसा हा लेडीज क्लोदिंग मधून बाद होत गेला. जेव्हा जीन्सची चलती वाढली तेव्हा सुद्धा हा खिसा अगदी नाममात्र राहिला.

या सर्वांमध्ये एका व्यवसायाला मोठा फायदा झाला. हा व्यवसाय होता पर्स आणि पाऊचचा. खिसे नसल्याने पर्स आणि पाऊचचा खप प्रचंड वाढला. आजही हा व्यवसाय तेजीत आहे.

स्रोत

मंडळी, खिसा हा तसा दुर्लक्षित पण महत्वाचा मुद्दा. या वर्षी हीदर केज़ीन्सकी या लेखिकेने याविरुद्ध आवाज उठवला होता. हा एक अपवाद सोडला तर महिलांकडून खिसा नसण्याला फारसा विरोध दिसून येत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required