हातचलाखी भोवली रॅनबॅक्सीच्या संचालकांना, झाला २५६२ कोटीचा दंड
रॅनबॅक्सी .भारतातील एक नंबरची औषध कंपनी .
२००८ साली कंपनीच्या प्रवर्तकांनी ही कंपनी जपानच्या दाइइची सॅन्क्यो कंपनीला विकली. ह्यात सर्वात जास्त फायदा तत्कालीन संचालकांना झाला कारण संचालक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याकडे कंपनीचे ३४.८२ टक्के समभाग होते. ही विक्री करताना मालविंदर आणि शिवेंदर सिंग या संचालकांनी काही माहिती देताना हातचलाखी केली .परिणामी कंपनी हातात आल्यावर दाइइची सॅन्क्योला अमेरिकेतील एका खटल्याची भरपाई म्हणून ३५० कोटी भरावे लागले.
भूतपूर्व संचालक कानावर हात ठेवून मोकळे झाले. जपानी कंपनीने मग सिंगापूरच्या लवादाकडे धाव घेतली आणि गेल्या आठ्वड्यात लवादाने मालवींदर आणि शिवेंदर सिंग या रॅनबॅक्सीच्या भूतपूर्व संचालकांना २५६२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. आता सिंगबंधू उच्च न्यायालयात या लवादाच्या निर्णयाविरुध्द दाद मागू शकतात पण लवादाच्या निकालाचा आधार घेऊन दाइइची सॅक्यो सिंग बंधूंच्या मालमत्तेवर टाचही आणू शकते.




