सुषमा स्वराज बनल्या ट्विटरवर जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेता

तुम्ही आजवर सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर परदेशात अडकलेल्या भारतीयांची मदत केल्याचे ऐकले असेलच. तर आता एका आंतरराष्ट्रीय संस्थेने केलेल्या सर्व्हेमध्ये सुषमा स्वराज यांनी बाजी मारली आहे. त्यांनी सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या महिला नेता बनण्याचा मान मिळवला आहे. 

या सर्व्हेचे नाव आहे Twiplomacy आणि त्यात आपले सोशल मीडिया सॅव्ही पंतप्रधानही काही मागे नाहीत. सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांच्या यादीत त्यांचा नंबर तिसरा लागतो. 

ट्विटरवरून सर्व्हिस डिलिव्हरी म्हणजेच लोकांची मदत करणाऱ्या मंत्र्यांमध्ये स्वराज यांचा नंबर खूप वरचा आहे. रेड टेप टाळून परदेशस्थ भारतीयांना मदत करणाऱ्या स्वराज यांचे 52 लाख फॉलोअर्स आहेत. त्यांनी असेच काम करत राहावे ही सर्वांची यापुढे अपेक्षा असणार आहे. त्यासाठी त्यांना बोभाटा.कॉमकडून शुभेच्छा!!

सबस्क्राईब करा

* indicates required