computer

या रोजच्या वापरातील १० गोष्टी चक्क नासाने तयार केलेल्या आहेत ??

आपल्यातील प्रत्येकजण चंद्रावर किंवा अवकाशात जाऊ शकत नाही, पण तुम्हाला माहित आहे का आपला आणि अवकाशाचा फार जवळचा संबंध आहे ? आपण ज्या गोष्टी रोजच्या आयुष्यात वापरतो त्यातल्या बऱ्याच गोष्टी या चक्क अवकाश संशोधन संस्था नासाने तयार केल्या आहेत.

चला तर पाहूया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या नासाने तयार केल्या आहेत.

१. मेमरी फोम.

आपल्या गाद्या उशांमध्ये मध्ये जो अत्यंत मऊ ‘फोम’ आढळतो तो खरं तर नासाची देण आहे. नासाने अवकाश यानातील सीट तयार करण्यासाठी हा फोम खास तयार केला होता. अवकाश यान जेव्हा पृथ्वीवर उतरवण्याची वेळ यायची तेव्हा अंतराळवीरांना दबाव सहन करता यावा म्हणून या फोमचा उपयोग केला गेला. पुढे जाऊन हा फोम गाद्यागिरद्या तयार करण्यासाठी पण वापरायला जाऊ लागला.

२. डस्ट बस्टर्स - धूळ साफ करणारं यंत्र

नासाने Black & Decker या कंपनीला एक असं यंत्र तयार करण्यास सांगितलं होतं जे चंद्राच्या मातीचे नमुने गोळा करू शकेल. पुढे जाऊन हेच तंत्र वापरून घरातील धूळ साफ करण्यासाठीचं यंत्र तयार करण्यात आलं.

३. स्क्रॅच-रेसिस्टंट लेन्स

चष्म्यावर सहज ओरखडा पडू शकतो. हे होऊ नये म्हणून हल्ली खास पद्धतीच्या काचा मिळतात. हे तंत्रज्ञान नासाने तयार केलेलं आहे. अंतराळवीरांच्या हेल्मेटच्या काचेवर धूळ आणि ओरखडा पडू नये म्हणून खास पद्धतीची काच तयार करण्यात आली होती. याच तंत्रज्ञानाला पुढे चष्मा बनवण्यासाठी वापरण्यात आलं.

४. कृत्रिम अवयव.

नासाने अंतराळ संशोधनासाठी लागणाऱ्या रोबोट्ससाठी कृत्रिम अवयव तयार केलेले. याच तंत्रज्ञानाने पुढे अनेक अपंग व्यक्तींना नवीन जीवन दिलं.

५. एथलेटिक शूज

अंतराळवीरांच्या हेल्मेट आणि सूटला धक्का सहन करता यावा यासाठी खास पद्धतीचे रबर तयार करण्यात आले होते. हे रबर पुढे जाऊन बुटांच्या खालच्या बाजूला असलेल्या रबरच्या जागी वापरण्यात आले. आज खेळाडू हे शूज मोठ्या प्रमाणात वापरतात.

६. कॅमेरा फोन

नासाने अंतराळयानातील दृश्य टिपण्यासाठी यानात कॅमेरा बसवण्याचं तंत्रज्ञान शोधून काढलं होतं. पुढे या तंत्रज्ञानाचा वापर कॅमेरा फोन तयार करण्यासाठी झाला. आज जवळजवळ सगळ्यांकडे कॅमेरा फोन आढळतो.

७. पाणी शुद्ध करण्याचं यंत्र - वॉटर प्युरिफायर्स

अंतराळयानातील पाणी शुद्ध करण्यासाठी नासाने कोळशाचा वापर करून तंत्रज्ञान विकसित केलं होतं. आज आपण जे वॉटर प्युरिफायर्स वापरतो त्यात हेच तंत्रज्ञान असतं.

८. वायरलेस हेडफोन्स.

अंतराळवीरांना वायर शिवाय एकमेकांना संपर्क करता यावा यासाठी वायरलेस हेडफोन तयार करण्यात आले होते. आज बाजारात सहज वायरलेस हेडफोन्स हेडफोन आढळतात.

९. कम्प्युटर माऊस

अंतराळ यानात कम्प्युटरचा वापर हा होतोच. हा कम्प्युटर जास्तीत जास्त सोप्यारीतीने वापरता यावा यासाठी माऊस तयार करण्यात आला.

१०. पोर्टेबल कम्प्युटर्स

नासाने GRiD compass नावाचा पहिला पोर्टेबल कम्प्युटर तयार केला होता. पुढे जाऊन हे तंत्रज्ञान वापरून लॅपटॉप तयार करण्यात आले.

 

तर मंडळी कशी वाटली माहिती ? आपण सगळेच नासाने तयार केलेली उत्पादने वापरतो हे तुम्हाला  माहित होतं का ?

सबस्क्राईब करा

* indicates required