computer

शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करणारे जवळजवळ रोजच्या आहारातले ११ पदार्थ!!

जगण्यासाठी खाणे किंवा खाण्यासाठी जगणे असो, माणसाच्या आयुष्यात अन्न हे सर्वात महत्वाचे! अन्नाचा पूर्ण शरीरावर,मनावर परिणाम होत असतो. आपण काय खातो यावर आपली प्रकृती अवलंबून असते. प्रत्येक अन्नपदार्थ हा विशेष असतो. त्याचे शरीरासाठी वेगवेगळे उपयोग होत असतात. आज आपण पाहूयात असे अन्नपदार्थ जे प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांपासून तुमचे संरक्षण करू शकेल. आपल्या एकंदर आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे महत्वाचे ठरते. त्यामुळे या पदार्थाचे सेवन केल्यास ते एक प्राथमिक ढाल म्हणून काम करतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून संरक्षण करतात.

गूळ

गूळ हा घरात असतोच. याचा उपयोग फुफ्फुसांमधील प्राणवायूचा प्रवाह वाढवण्यास होतो. त्यामुळे श्वास घेणे सोपे होते. तसेच गुळामुळे फुफ्फुसांतील ब्रोन्कियल स्नायूंना आराम मिळतो.

मासे(fatty fish)

माशांमध्ये भरपूर fats असतात. तसेच ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे हे उत्कृष्ट स्त्रोत असतात. ओमेगा -3 फॅटी ऍसिड हे फुफ्फुसांच्या चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. तसेच यातले इतर गुणधर्म जसे anti-inflammatory, anti-carcinogenic, and anti-oxidative फुफ्फुसांच्या आजारांपासून आणि वायू प्रदूषणाच्या हानिकारक प्रभावांपासून आपले रक्षण करतात.

सफरचंद

सफरचंद हे आरोग्याच्या दृष्टीने परिपूर्ण फळ मानले जाते.लंडनमधील डॉक्टरांनी ४५-४९ वयोगटातील २,५०० पेक्षा जास्त पुरुषांच्या शरीराचा अभ्यास केला. त्यात असे दिसून आले की जे व्हिटॅमिन सी, ई आणि बीटा-कॅरोटीन, तसेच लिंबूवर्गीय फळे, सफरचंद आणि फळांचे रस यांचे योग्य प्रमाणात सेवन करतात त्यांचे फुफ्फुसाचे कार्य जास्त चांगले असते.

अक्रोड

अक्रोडमध्ये ही ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते. अक्रोडाचे नियमित सेवन केल्याने दमा आणि श्वसनाच्या सबंधित काही आजार असतील तर ते दूर होण्यास मदत होते.

बीटरूट

बीटरूटने रक्त वाढते हे तर आपल्याला माहिती असेल, पण यामुळे फुफ्फुसांचेही आरोग्यही सुधारते. याचे कारण त्यात नायट्रेट संयुगे असतात. तज्ञांच्यानुसार नायट्रेट्स रक्तवाहिन्या शिथिल करण्यास, रक्तदाब कमी करण्यास आणि ऑक्सिजन शोषणास करण्यास मदत करतात. तसेच बीटरूटमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि कॅरोटीनॉइड अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे बीटरूटचे सेवन करावे.

लसूण

लसूण : यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ॲलिसिन (allicin) असते. यात anti-inflammatory गुणधर्म असतात. लसणाच्या नियमित सेवनाने संसर्ग आणि जळजळ होण्याचा धोका देखील कमी होतो, ज्यामुळे दमा किंवा ब्राँकायटिस सारखे श्वसनाचे विकार होऊ शकतात.

मिरची

मिरचीमध्ये capsaicin नावाचे संयुग समृद्ध असते, जे mucous स्राव करण्यास मदत करते. त्यामुळे ते श्वसनमार्ग साफ ​​करते आणि त्वचेचे संरक्षण होते. यामुळे श्वसन आरोग्य सुधारते. मिरचीमध्ये बीटा-कॅरोटीनचे प्रमाण खूप प्रमाणात असते, जे अस्थमापासून आपला बचाव करते.

भोपळा

भोपळ्यात विविध प्रकारचे वनस्पती संयुगे असतात. ती फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत देतात. यामध्ये बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसह कॅरोटीनॉइड्स देखील असते, त्यामुळे हे एक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. यामध्ये शरीराची उष्णता कमी करण्याचे गुणधर्म असतात.

हळद

हळदीमध्ये कर्क्युमिन (curcumin) नावाचा घटक भरपूर प्रमाणात असतो आणि त्यात दाहक-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्म असतात. हे बॅक्टेरिया-जनित संक्रमण आणि आजारांशी लढण्यास मदत करते. हे दम्याविरूद्ध नैसर्गिक ढाल म्हणून देखील कार्य करते. जास्तीत जास्त फायद्यांसाठी हळद दुध पिणे जास्त उपयोगी ठरते.

ब्रोकोली

ब्रोकोली म्हणजे हिरवा फ्लॉवरच! आता शहरातही प्रत्येक मॉल मध्ये किंवा भाजीवाल्याकडे ब्रोकोली मिळतो. ब्रोकोलीत व्हिटॅमिन सी, कॅरोटीनॉइड्स, फोलेट आणि फायटोकेमिकल्स भरपूर असतात, जे फुफ्फुसाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात. एका अभ्यासानुसार, ब्रोकोली निकोटीनचे विष काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे धूम्रपान करणाऱ्यांच्या फुफ्फुसांना जी हानी होते ती सुधारण्यास मदत होते.

आले

आले हे फुफ्फुसांसाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करते. यात anti-inflammatory (दाहक-विरोधी) गुणधर्म आहेत. आले हे घरात सहज उपलब्ध असते. चहा किंवा भाजीत घालून ते सहज वापरता येते. आल्याचा रस ही उपयोगी ठरतो.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required