computer

या १७ वर्षांच्या पोराने कामाच्या तिसऱ्या दिवशीच इतिहास घडवला !!

Subscribe to Bobhata

नासाच्या TESS उपग्रहाने (Transiting Exoplanet Survey Satellite) एका छायाचित्रात एका नवीन ग्रहाचा शोध  लावला आहे. TESS उपग्रहाने शोधलेला हा पहिला ग्रह आहे. या ग्रहाला "TOI 1338 b" नाव देण्यात आलंय. ग्रह जरी TESS ने शोधला असला तरी तो ओळखण्याचं काम एका नवख्या शास्त्रज्ञाने केलंय. हा शास्त्रज्ञ अवघ्या १७ वर्षांचा आहे. आश्चर्य म्हणजे कामाच्या तिसऱ्या दिवशीच  हा पराक्रम केलाय.

नासाने TESS उपग्रहाद्वारे अभ्यास करण्याचा एक वेगळा मार्ग शोधून काढला आहे. नासाने सामान्य नागरिकांनाच अभ्याससाठी पाचारण केलंय. १७ वर्षांचा वूल्फ कुकर हा हायस्कूलचा विद्यार्थी या कामासाठी नासामध्ये दाखल झाला होता. तो नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर येथे काम करत होता. सुरुवातीला त्याला ताऱ्यांच्या प्रकाशातील बदल तपासण्याचं काम देण्यात आलं होतं.

ताऱ्यांच्या प्रकाशात जर बदल होत असेल तर तो तारा नसून ग्रह असण्याची शक्यता असते. हे काम एखाद्या मशीनद्वारे पण करता येऊ शकतं, पण अशा बारीक बदलांच निरीक्षण करण्यासाठी मानवी डोळ्यांना पर्याय नसल्याचं सिद्ध झालं आहे.

हा शोध कसा लागला ?

या पोऱ्याने काम सुरु करून ३ दिवस झाले असतील नसतील तोच त्याने एक निरीक्षण नोंदवलं. उपग्रहाद्वारे गोळा केलेल्या माहितीचा एक विभाग म्हणजे eclipsing binary. म्हणजे दोन तारे समोरासमोर आल्यामुळे होणारी ग्रहणसदृश्य परिस्थिती. ही माहिती तपासत असताना त्याला  TOI 1338 सिस्टमकडून एक सिग्नल मिळाला. त्याला वाटलं की ताऱ्यांचं ग्रहण असावं पण वेळेत फरक जाणवत होता. आणखी निरीक्षण केल्यावर समजलं की तो तारा नसून ग्रह आहे.

पृथ्वी आणि या ग्रहातलं अंतर तब्बल १३०० प्रकाशवर्ष एवढं प्रचंड आहे. हा नवीन ग्रह पृथ्वीपेक्षा ६.९ पट मोठा आहे.एवढ्या मोठ्या आकारातील हा आजवर सापडलेला १३ वा ग्रह आहे.

काहीही म्हणा पण अवघ्या ३ दिवसांच्या नोकरीत एवढी मोठी प्रगती फारच कमी लोकांना जमते.

सबस्क्राईब करा

* indicates required