computer

टेलिफोनवर झालेलं पहिलं संभाषण काय होतं? ग्राहम बेल आणि त्यांच्या टेलीफोनची गोष्ट !!

१० मार्च १८७६ हा जगातला संभाषण क्रांती दिवस म्हणला पाहिजे. याच दिवशी टेलिफोन चे जन्मदाते ग्राहम बेल यांनी टेलिफोनवरून जगातलं पहिलं संभाषण केलं. – “Mr. Watson... come here... I want to see you.” हे वाक्य जगाच्या इतिहासातलं पहिलं वाक्य, जे टेलिफोनवर बोललं गेलं. वॉट्सन यांनी आपल्या सहकारी मित्रालाच फोन केला. न्यूयॉर्क मध्ये टेलिफोन लाईनच्या उद्घाटनासाठी कार्यक्रमात त्यांनी हा फोन करूनच कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

ग्राहम बेल यांचं मूळ नाव अलेक्झांडर. त्यांचं कुटुंब स्कॉटलँडमधलं होतं तर एडिनबर्ग हे त्याचं जन्मगाव. साऊथ शेर्लोट स्ट्रिटवर त्याचं घर होतं. आता हा परिसर अलेक्झांडर ग्राहम बेलचं जन्मगाव म्हणून खूप प्रसिद्ध आहे. टेलिफोनचा शोध लावल्यानंतर अलेक्झांडर हे नाव वगळून ‘ग्राहम बेल’ हे नाव सर्वदूर झालं. टेलिफोनचे जन्मदाते ग्राहम बेल यांनी टेलिफोनचं संशोधन करून सम्पूर्ण जगाला जवळ आणलं.

गरज हीच संशोधनाची जननी म्हणतात तसंच ग्राहम यांचही झालं. त्यांचं बालपण खूप खडतर होतं. आई कर्णबधीर होती. दोन भाऊ होते. मेल्विले जेम्स बेल आणि एडवर्ड चार्ल्स बेल. दोन्ही भावांचं आजारामुळे अकाली निधन झालं. ते एकटेच राहिले. बोलायला कोणीच नाही. आईलाही ऐकू यायचं नाही त्यामुळे लहानपणापासून कर्णबधीरांबद्दल त्यांना आपुलकी होती. पुढे थोडं मोठं झाल्यावर ते कर्णबधीरांना शिकवू लागले. स्वरयंत्र या विषयावर ते शिकवायचे. यातूनच स्वरयंत्र तयार करावं असा विचार त्यांना आला.

बॉस्टन विद्यापीठातच माबेल ह्युबार्ड नावाची एक कर्णबधिर विद्यार्थिनी होती. ग्राहम बेल तिच्या प्रेमात पडले पुढे त्यांनी तिच्याशी लग्नही केलं. असं म्हणतात की, माबेल हीच ग्राहम बेलच्या टेलिफोन बनवण्यामागची प्रेरणा होती. स्वरयंत्रापासून टेलिफोन बनवताना त्यांना सगळ्यात जास्त प्रेरणा मिळाली ती माबेलमुळेच.

७ मार्च १८७६ ला त्यांना टेलिफोनचं पेटंट मिळालं आणि १० मार्चला त्याद्वारे पहिले जाहीर संभाषण झाले.

ज्या प्रेरणेतून आणि अविरत प्रयत्न करून त्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर हा अफाट शोध लावला त्याला सलाम. अखेर २ ऑगस्ट १९२२ रोजी आजारपणामुळे त्यांचे निधन झालं. त्यावेळी सगळीकडे एक शोककळा पसरली. या महान संशोधकास श्रद्धांजली म्हणून अवघ्या अमेरिकेने तेव्हा एक मिनिट टेलिफोन बंद ठेवले होते.

आज स्मार्टफोन मुळे जग अजून जवळ आलं. संभाषण अजून सोपं झालं. पण या मूळ जनकाला जग कधीही विसरणे शक्य नाही.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required