computer

आपण मठ्ठ आहोत की आपला मेंदू आपल्यालाच फसवतो ?

माणसाला ज्या बौध्दिक क्षमतेचा तोरा मिरवायला आवडतं ती क्षमता किती बेभरवशाची आहे हे सिध्द करणारे हे एक आव्हान आज तुमच्यासमोर ठेवतो आहोत.

फार काही कठीण काम करायचं नाही आहे. सोबत इंग्रजीत एक ओळ दिली आहे.

त्या ओळीमध्ये एफ (F) हे अक्षर किती वेळा आले आहे तेच फक्त १० सेकंदात सांगायचं आहे.सोपं वाटेल पण ....

प्रामाणिक प्रयत्न करून बघा.पहिल्या प्रयत्नात उत्तर चुकतंच.

“Finished files are the result of years of scientific study combined with the experience of years.”

एकूण सहा वेळा (F) अक्षर वापरलं गेलं आहे पण बहुतेक माणसांचे उत्तर पहिल्या प्रयत्नात चुकतं. पण का चुकलं हे मात्र फक्त मेंदूच जाणे. किंबहुना आपला मेंदू आपल्यालाच कळत नाही हे कळतं. 
त्याचं शास्त्रीय उत्तर असं आहे की आपण  वाचल्यानंतर OF या शब्दामधील  (F)  ची नोंद मेंदू घेतच नाही. (OF)  हा शब्द आपण इतक्या वेळा आपल्या वाचनात येतो की आपला मेंदू (OF)ला शब्द न समजता 'संकेतचिन्ह'च समजतो.परिणामी उत्तर चुकतं !

सबस्क्राईब करा

* indicates required