computer

बैलाची किंमत एक कोटी ? बंगळुरूच्या कृषी मेळाव्यात'कृष्णा' नावाच्या बैलाला विक्रमी किंमत !

एखाद्या बैलाची किंमत किती असू शकते? जास्तीत जास्त एक ते दोन लाख रुपये! पण एका कृषी मेळाव्यात बैल चक्क १ कोटी रुपयांना विकला गेला आहे! खरं वाटत नाही ना? बंगळुरूमध्ये भरलेल्या कृषी मेळाव्यात कृष्णा नावाच्या  बैलाला खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी हजार, लाख नाही तर कोटींची बोली लावली. आणि त्याला १ कोटी रुपयात खरेदीही केले आहे.

बंगळुरूमध्ये  नोव्हेंबरमध्ये  चार दिवसीय कृषी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होते. या मेळाव्यात शेतीसाठी महत्वाचे असे साहित्य तसेच बैलांचीही खरेदी विक्री होते. या वर्षी सगळ्यात जास्त कृष्णाचीच  चर्चा होती. कृष्णाला पाहण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. या बैलाचे वय साडे तीन वर्ष आहे. हा हल्लीकर जातीचा बैल असून ही जात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. हल्लीकर ही भारतातील कर्नाटक राज्यातील प्राण्यांची एक जात आहे. हे नाव हल्लीकर समाजावरून पडले आहे जो परंपरागतपणे गुरे पाळण्यासाठी ओळखला जातो. हे सामान्यतः दक्षिण कर्नाटकातील म्हैसूर, मंड्या, हसन आणि तुमकूर जिल्ह्यांच्या पारंपारिक हल्लीकर पट्ट्यात आढळतात. या बैलांची खासियत म्हणजे त्यांचं वजन ८०० ते १००० किलोपर्यंत असतं, आणि उंची ६.६ फूट ते ८ फूटांपर्यंत असते.बैलाच्या मालकाने सांगितलं की, हल्लीकर जातीच्या बैलाचं स्पर्म म्हणजेच वीर्याची खूप मागणी असते. त्याच्या वीर्याचा एक डोज एक हजार रुपयांमध्ये विकला जातो. हल्लीकर जातीच्या ज्या गायी आहेत ,त्यांच्या दुधाला जास्त मागणी असते. त्यात पौष्टिकता जास्त असते असे म्हणतात. या A2दुधात जास्त प्रमाणात प्रोटीन असतं.

मेळाव्यात सर्वसाधारण बैल एक ते दोन लाखांना विकले जातात. इतका महाग बैल विकला जात नाही. पण यंदा  कृष्णा बैल कोटींमध्ये विकला  गेल्याने बैलाच्या मालक बोरेगौडा आनंद व्यक्त केला आहे.या मेळ्याव्यात पारंपरिक, स्थानिक आणि संकरित पिकांच्या जाती आणि शेतीतील यंत्रसामग्री याशिवाय गुरेढोरे, कुक्कुटपालन, सागरी शेती यांचेही ५५० स्टॉल लावण्यात आले होते.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required