गोष्ट अंतराळात गेलेल्या मांजरीची, माहितेय का तुम्हांला? सोबत तिचा व्हिडिओही पाहा..

Subscribe to Bobhata

तुम्हाला अंतराळात माणसांपूर्वी गेलेल्या कुत्र्याची माहिती असते, माकडाचीही माहिती असते पण असाच पराक्रम एका मांजरीने केलेला असूनही ही माहिती आपल्यापर्यंत नीट पोहोचलीच नाही.

शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि रशियामध्ये अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरू होती. याच काळात युरोपियन स्पेस ऑर्गनायझेशनचा महत्त्वाचा सदस्य असलेल्या फ्रान्सनेही आपला स्वतंत्र अंतराळ कार्यक्रम राबवायला घेतला होता. या कार्यक्रमाचा भाग म्हणून फ्रान्सने स्वतः विकसित केलेल्या व्हेरोनिक एजी१ रॉकेटच्या साहाय्यानं  २४ ऑक्टोबर, १९६३ रोजी एक यान अंतराळात धाडलं. अल्जेरियाच्या वाळवंटातून अवकाशात झेपावलेल्या या यानामध्ये फेलिसिटी नावाची टक्सिडो कॅट म्हणजेच आपली वाघाची मावशी  होती.

स्रोत

त्या यानानं पृथ्वीपासून सुमारे १३० मैल अंतर गाठलं.  त्या वातावरणात फेलिसिटी सुमारे पंधरा मिनिटे राहिली आणि पुन्हा पृथ्वीवर परतली. पृथ्वीबाहेरील वातावरणाचा प्राण्यांवर, त्यांच्या मेन्दूच्या क्षमतेवर काय परिणाम होतो याचा फेलिसिटीच्या परिक्षणातून पुढे अभ्यास केला गेला.

फ्रेन्चांनी आपला अंतराळ कार्यक्रम काही कारणांनी पुढे सुरू ठेवला नाही आणि परिणामी फेलिसिटीचं कार्य आणि नाव लोकांच्या आठवणीतून निसटून गेलं. फेलिसिटीला रशियन कुत्री लायका सारखी प्रसिद्धी लाभली नाही , पण अंतराळ संशोधनाच्या इतिहासात फेलिसिटीचं नाव पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेलेली पहिली ऍस्ट्रोकॅट म्हणून नोंदलं गेलं आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required