computer

फोटोपेक्षा आपण आरशात का छान दिसतो?? हे आहे ते कारण!!

आजकाल कुठलीच माहिती मिळवणंअवघड राहिलं नाहीय. गुगल नावाचा जिनी 'क्या प्रश्न है मेरे आका" म्हणत प्रश्न पूर्ण होण्याआधीच उत्तरं द्यायला सुरुवात करतो, तरीही आपल्यातल्या आळशीपणामुळे आपण गुगलला कधीच विचारत नाही. त्यातलाच एक प्रश्न म्हणजे फोटोतल्यापेक्षा आपली आरशामधली  प्रतिमा का चांगली दिसते? काय आहे यामागचे रहस्य जाणून घेऊयात......

आरशातली प्रतिमा आणि फोटोत दिसणारे आपण या दोन भिन्न गोष्टी आहेत.   एका संशोधनानुसार असे दिसून आले आहे की माणसाला फोटोत आपण जसे दिसतो त्यापेक्षा आपण आरशात कसे दिसतो हे जास्त भावते. याचे कारण असे आहे की फोटोतली प्रतिमा त्रयस्थ व्यक्तीने अनेक वेळेस काढलेली असते, पण याऊलट आरशात आपण स्वतः चे प्रतिबिंब पाहून खुश होतो. आपल्याला आरशामध्ये बघायची एवढी सवय जडलेली आहे की कित्येकदा आपल्याला सेल्फी काढल्यानंतर तोही आपल्या चेहऱ्याच्या जे काही असेल त्या सौंदर्याला न्याय देतोय असे वाटत नाही.

तसाही आपल्यापैकी प्रत्येकाचा चेहरा हा वेगळा असतो.  या गोष्टीचा याबाबतीत फार मोठा संबंध आढळून येईल. कदाचित आपल्यापैकी  कोणाचा कान मोठा असेल किंवा कोणाचे डोळे मोठे असतील, आपल्यातील काही जण वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल करतही असतील पण क्लिक केल्यानंतर आलेला फोटो हा नेहमीच काहीशा प्रमाणात वेगळा दिसतो

म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही तुमचा  फोटो  पाहायला घेता तेव्हा त्या फोटोबद्दल तुमचे एक मत तयार केलेले असते.  तुम्ही फोटो काढला जात असताना पोट आता घेतलेले असते, ताठ उभे पाहून-मान उंच करून उंचीचा आभास निर्माण केलेला असतो, केस नीट विंचरलेले असतात, कित्येकदा त्यासाठी खास कपडे घातलेले असतात, त्यामुळे या फोटोत तुम्ही छान दिसत असणार अशा तुमच्या  अपेक्षा निर्माण झालेल्या असतात. पण प्रत्यक्षातला फोटो तुमच्या अपेक्षेइतका काही चांगला नसतो.  मग तुम्हांला तुम्ही फोटोत कसे दिसत आहात हे  पहायलाही आवडत नाही. याउलट जर त्या फोटोबद्दल तुम्ही तुमच्या नातेवाईकांचे किंवा मित्रमैत्रिणींचे मत विचारात घेतले तर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या मते तो तुमचा काही इतका वाईट फोटो नसतो. तेव्हा तो फोटो बरा आहे असं तुम्हाला वाटतं.

शेवटी काय, आरशातले आपण म्हणजे शीला की जवानीसारखं " मैं खुदसे प्यार जताऊं" सारखं असतं. आणि फोटो म्हणजे दिसतं तसं असतं. तुम्हांला कधी तुमचव न आवडलेले फोटो नंतर खरंच तितके वाईट नव्हते असा साक्षात्कार झालाय का??

लेखक : रोहित लांडगे

 

सबस्क्राईब करा

* indicates required