computer

कुलूप-किल्लीची जोडी चालते तरी कशी? वाचा इथेच..

कुलूप आणि किल्ली ही जोडी जरी आकाराला छोटीशी असली तरी या जोडीने आपले आयुष्य खूपच सुसह्य केले आहे. एकदा का कुलूप लावले आणि किल्ली सुरक्षित ठिकाणी ठेवली तर आपण निर्धास्तपणे कुठेही जायला मोकळे. पण एवढ्याशा कुलपात इतकी भन्नाट सिस्टीम कशी आहे ज्यामुळे त्याच चावीशिवाय ते उघडणे कठीण होऊन जावे, हा प्रश्न कायम आपल्याला सतावत असतो. आज त्याचेही उत्तर जाणून घेऊ.

अतिशय सोप्या पण तितक्याच भन्नाट मार्गाने हे कुलूप उघडले जात असते. आमचा प्रयत्न हा आपले नेहमीचे कुलूप आत कसे काम करते हे सांगण्याचा आहे. तसे तर कुलपांचे अनेक प्रकार आहेत पण आज आपल्या साध्या सोप्या कुलूपाबद्दल समजून घेऊ.

हा फोटो पाह्यला तर कुलूप आतून कसे असते याचा अंदाज येतो. यात जेव्हा हळूच आपण किल्ली ढकलतो तेव्हा याप्रकारे आतील परिस्थिती तयार झालेली असते.

आता दुसरा फोटो बघितला तर तुम्हाला समजेल की बरोबर किल्ली कुलूपात टाकली तर किल्लीची कळ आणि कुलूप यांच्यात समन्वय साधला जातो.

आता तिसरा फोटो बघितला तर तुम्हाला समजेल, जेव्हा किल्ली आणि कुलुपातील अंतर्गत भाग यांचा समन्वय साधला जातो तेव्हा आपण किल्ली फिरवली की बरोबर आतली संपूर्ण सेटिंग फिरते. पण जर किल्लीच चुकीची असली तर असे घडत नाही.

किल्ली कितीही लहान असली तरी एवढ्याशा किल्लीत अनेक महत्वाचे भाग असतात. यातला एकही भाग व्यवस्थित फिट बसला नाही तरी ती फिरत नाही आणि कुलूपही उघडत नाही. किल्लीत पाच मुख्य भाग असतात.

१) हेड - किल्लीचा हा भाग म्हणजे ती कुलूपात टाकताना आपल्या हातात धरलेला भाग.

२) शोल्डर - हा भाग किल्लीला एका विशिष्ट मर्यादेनंतर पुढे जाऊ देण्यापासून रोखतो.

३) ब्लेड - थोडक्यात, पातं. हा लांब भाग कुलूपाच्या आत जातो.

४) कट्स - किल्लीच्या पात्याचा दातेरी भाग.

५) टीप - किल्लीच्या शेवटचा टोकदार भाग.

आता हे पाच भाग बघितल्यावर सर्वात महत्वाचा भाग हा कट्स असतो हे एव्हाना तुम्हाला समजले असेलच. कारण हा दातेरी भाग बदलला, की किल्लीही बदलावी लागेल. या कट्सची रचना कुलूपातल्या स्प्रिंग यंत्रणेच्या हिशोबाने केलेली असते. अनेकदा किल्ली बरोबर आत जाते पण तरीही ती काय फिरण्याचे नाव घेत नाही. याचे कारण म्हणजे कुलुपात असलेली पिन आणि किल्लीचे कट्स यांचा योग्य समन्वय होण्यात कुठेतरी अडचण आलेली असते.

अशा पद्धतीने बाहेरून अतिशय लहान आणि सोपे वाटणारं हे कुलूप-किल्ली समीकरण आतमध्ये मात्र चांगलेच गुंतागुंतीचे असते.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required