पहा हबल टेलिस्कोपने कैद केलेली आकाशात होऊ घातलेल्या दोन आकाशगंगांची टक्कर

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या हबल टेलिस्कोपने आकाशात होऊ घातलेल्या दोन आकाशगंगांची टक्कर आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. या दोन्ही आकाशगंगा एकमेकांना टक्कर देऊ शकतात. यातून घाबरून जाण्यापेक्षा शास्त्रज्ञ सकारात्मक बाब म्हणून याकडे पाहत आहेत. यातून एक जबरदस्त स्फोट होऊन नव्या स्टारबर्स्ट आकाशगंगेची निर्मिती होऊ शकते आणि नव्या ताऱ्यांचा जन्म होऊ शकेल. युरोपियन स्पेस एजन्सीने हा फोटो प्रसारित केला आहे आणि जगभर ही घटना क्लॅश ऑफ टायटन्स म्हणून ओळखली जात आहे.

आकाशगंगांच्या या जोडीचे नाव IC १६२७ असे आहे. ही जोडी पृथ्वीपासून २७.५ कोटी प्रकाशवर्षं दूर सेट्स नक्षत्रात आहे. या आकाशगंगांच्या मीलनाने गॅसचा एक शक्तीशाली प्रवाह निर्माण होईल असेही म्हटले जात आहे. आकाशगंगा इन्फ्रारेड किरणांमधून पाहिल्यास ती अतिशय प्रखर दिसते. तसेच त्यात काही प्रमाणात गरम आणि दाट गॅस असतो. यापूर्वी दोन आकाशगंगांचा मिलाफ घडल्याची घटना पहिल्यांदा २००८ साली घडली होती. नासाच्या हबल या शक्तिशाली दुर्बिणीतून ही घटना पहिली तेव्हा त्यांना असे दिसून आले की वेगाने येणाऱ्या या आकाशगंगांमधले गॅसेस एकमेकांत मिसळून मोठ्या प्रमाणात तारकांची निर्मिती होईल आणि त्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा अतिप्रखर प्रकाश उत्सर्जित करेल. हबलने ही घटना पाहण्यासाठी आणि संशोधनासाठी अद्ययावत कॅमेऱ्यांचा उपयोग केला आणि त्याद्वारे ऑप्टिकल आणि इन्फ्रारेड किरणांचा अभ्यास करून हा फोटो बनवला.

अंतराळावीरांनी IC १६२३चे बारीक तपशील आणि या आकाशगंगांची संभाव्य टक्कर सादर करण्यासाठी इन्फ्रारेड ते अल्ट्राव्हायोलेट अशा वेगवेगळ्या तरंगलांबींच्या आठ फिल्टर्सचा उपयोग केला. यावर्षी नासा जेम्स वेब टेलिस्कोप लॉंच करणार आहे. वैज्ञानिकांना विश्वास आहे की या नव्या दुर्बिणीतून दूरवर असलेल्या आकाशगंगांच्या बाबतीत माहिती गोळा केली जाऊ शकेल. त्याचबरोबर या आकाशगंगांची निर्मिती कधी झाली याबद्दलही अधिक माहिती मिळवता लावता येणार आहे. हबल टीमने सांगितले की टेलिस्कोप हा IC १६२३सारख्या वातावरणात ताऱ्याना जन्म देण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींवर अधिक प्रकाश टाकणार आहे.

हबल टेलिस्कोपची ओळख ही अवकाशाचा डोळा अशी आहे. यात आलेल्या बिघाडामुळे तिच्या डागडुजीचे काम सुरू आहे. हबल टेलिस्कोपने गेल्या ३० वर्षात अवकाशात प्रचंड शोध घेतला आहे. १९९० साली ही दुर्बीण सेट कऱण्यात आली होती. सध्या त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे नासाच्या इंजिनिअर्सनी सांगितले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required