'लय डेंजर' F-16 फायटर विमान आहे तरी काय...वाचा या विमानाबद्दल!!

काल फ्रान्समध्ये टाटा आणि लॉकहीड-मार्टीन या दोन मातब्बरांनी F-16 (Block 70) हे लढाऊ विमान भारतात बनवण्याच्या करारावर स्वाक्षर्‍या केल्या.

सर्व सामान्य माणसांच्या जगात या बातमीने काही फरक पडला नसला तरी जगभरातील इतर देशांच्या संरक्षण खात्यांत खळबळ माजली आहे आणि त्याचे कारण ही तसेच आहे .

एफ -१६ या विमानाची ख्याती तशीच "लय डेंजर विमान" अशी आहे. अत्यंत चपळ हालचाली करणारे हे विमान म्हणजे हवेत उडणारा बहिरी ससाणा आहे. कधीही एका झेपेत 'गेम' वाजवेल आणि उडून दूर जाईल हे सांगता येणार नाही अशी या विमानाची प्रसिध्दी आहे.

आहे तरी काय असे या विमानात ते आपण बघू या !!

4स्रोत

विमानाची हवेतली चपळता त्याच्या डिझाईनवर अवलंबून असते. लॉकहीड-मार्टीन या कंपनीला एरो-डायनामिक्सचा म्हणजेच विमानाच्या अवकाशातल्या गतिमानतेचा १०० वर्षांचा अनुभव आहे. दुसरी गोष्ट हवेत उडणारे प्रत्येक विमान चपळ तर असावेच, पण त्याचे वजनही कमी असावे लागते. F-16 हे विमान सिंगल इंजिन (एकच इंजिन असलेले) विमान आहे. साहजिकच विमानाचे वजन त्यामुळे कमी आहे. एफ-१६ या जातकुळीतल्या पहिल्या विमानाची निर्मिती १९७४ साली करण्यात आली. या अगोदरच्या F-15 या विमानातल्या वजन आणि इंधन क्षमता यातल्या उणीवा दूर करून या विमानाची निर्मिती झाली आहे. आता पर्यंत एकूण ४५०० विमानांची निर्मिती लॉकहीड मार्टीन या कंपनीने केली आहे.

3स्रोत

आपल्याला जशी टोपण नावं असतात तशी विमानाला पण असतात- वैमानिक कौतुकाने एफ १६ ला उडणारा ससाणा म्हणतात तर काहीजण या विमानाच्या पुढचा भाग व्हायपर म्हणजे घोणसाच्या डोक्यासारखा दिसतो म्हणून व्हायपर म्हणतात. ससाणा म्हणा किंवा घोणस म्हणा. व्हायपरचा आणखी एक अर्थ घातकी म्हणजे आपल्या भाषेत लय डेंजर असा होतो.

2स्रोत

या विमानाच्या डिझाइनमध्ये काही बदल नव्याने करण्यात आले आहेत जे आधीच्या विमानात नव्हते. उदाहरणार्थ - कंट्रोलस्टिक वैमानिकाच्या उजव्या हाताशी सहज वापरता येईल अशी ठेवण्यात आली आहे. या विमानाचे हूड किंवा कॅनोपी (काचेचे छप्पर) अत्यंत पारदर्शी आहे, आणि टॆ वैमानिकाला डाव्या आणि उजव्या बाजूला ४० अंश आणि वर खाली १० अंश सहज निरिक्षण करता येईल अशा पध्दतीचे आहे.  हवेत असताना पाठलाग करणार्‍या इतर विमानांना हूलझपट देण्यासाठी याचा फायदा होतो.

6स्रोत

विमानाची निगराणी किंवा देखभाल सहज करता यावी म्हणून पॅनेल अशा पध्दतीने बसवली आहेत की मेंटेनंन्स करताना शिडीची आवश्यकता भासत नाही.

9स्रोत

आता सगळ्यात महत्वाचे वैशिष्ट्य जे समजायला थोडे कठीण आहे ते बघू या.

या विमानात high-G maneuvers सहज करता येतात. हाय-जी म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द विमान जेव्हा अचानक वर जाते तेव्हा इंधन मोठ्या प्रमाणात वापरले जाते. ही high-G maneuvers जेव्हा तुम्ही सोबत जोडलेली व्हिडीओ क्लिप बघाल तेव्हाच त्यांचा अंदाज येईल.

एफ १६ य विमानात फ्लाय बाय वायर हे तंत्र वापरले आहे. या तंत्रामुळे विमान हाताळायला सहज सोपे होते. अचानक वरच्या बाजूने झेप घेण्यासाठी पंख अशा पध्दतीने वळवता येतात की त्यामुळे विरोध करणार्‍या हवेची उशी तयार होते आणि विमान सहज वर झेपावते.

slatsस्रोत

शत्रूंच्या विमानाचा अचूक वेध घेण्यासाठी F-16 मध्ये अत्याधुनिक रडार यंत्रणा बसवलेली आहे.

आता अमेरिकन हवाई दलात मात्र या विमानाचा वापर होत नाही. परंतू इतर देशांसाठी या विमानांची निर्मिती केली जाते.

भारताच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल आहे याची अनेक कारणे आहेत. वायुदलाला अधिकाधिक तगडे बनवण्यासाठी सरकार medium multi role combat aircraft  शोधात होते. ही त्रुटी भरून काढण्यासाठी आपण आधी दसॉं (Desalt) या फ्रेंच कंपनी कडून ३० राफाल विमाने ‘रेडी टू फ्लाय या करारानुसार विकत घेतली आहेत. पण या विमानांची भारतात निर्मिती करणे शक्य नाही. परंतु टाटा उद्योग समूहाची टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स ही कंपनी भारतात लॉकहीड साठी हैद्राबाद येथे  C-130 J Super Hercules air lifter आणि   Sikorsky S-92  हेलीकॉप्टरचे सांगाडे बनवते. त्यामुळे F-16 विमानांची निर्मिती करणे आपल्याला सहज शक्य आहे.

संरक्षण खात्याच्या नियोजनामध्ये आपल्याकडे २१ फायटर विमानांचा ताफा असलेल्या ४२ स्क्वाड्रनची आवश्यकता होती. आत्तापर्यंत १० स्क्वाड्रनची त्रुटी होती जी आता सहज भरून निघेल.

आपल्या वायुदलाची मदार मिराज -सुखोई या विमानांवर होती. आपल्याकडे रशियन विमाने तर पाकीस्तानकडे अमेरिकन विमाने अशी परिस्थिती होती. आता भारताकडे अमेरिकेचा झुकता कल आहे असे दिसते आहे.

ह्या विमानामुळे भारतीय वायुदलाचा दबदबा तर वाढलाच आहेच आणि भविष्यात आपण कधीही हवेत हल्लाबोल करू शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required