व्हिडीओ ऑफ दि डे : भारताच्या 'चांद्रयान-२'चं यशस्वी प्रक्षेपण....हा ऐतिहासिक क्षण या व्हिडीओ मध्ये पाहा !!

मंडळी, आज मोठा दिवस आहे. भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेने आकाशात झेप घेतली आहे. १४ तारखेला होणारं हे उड्डाण तांत्रिक कारणाने पुढे ढकलण्यात आलं होतं. मोहिमेतील कमतरता लक्षात आल्यानंतर पुढील २४ तासात शास्त्रज्ञांनी उणीव भरून काढली. २ ते ३ दिवसातच यशस्वी चाचण्या करण्यात आल्या आणि आज आखरे श्रीहरीकोटा येथून २ वाजून ४३ मिनिटांनी “चांद्रयान-२”चे आकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.

मंडळी, हा क्षण श्रीहरीकोटा मधून अनुभवणे हा एकमेवाद्वितीय अनुभव असला असता, पण आपल्यातील प्रत्येकाला हे शक्य नाही. त्यासाठीच बोभाटा तुमच्यासाठी मोहिमेच्या उड्डाणाचा क्षण घेऊन आलं आहे. ह्या व्हिडीओ मध्ये चांद्रयान-२ अवकाशात भरारी घेतानाचा क्षण पाहा.

 

सबस्क्राईब करा

* indicates required