computer

"माणसासाठी जरी हे छोटे पाऊल असले तरी मानवतेसाठी ही मोठी मजल आहे."

आज म्हणजे २० जुलै रोजी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. नील आर्मस्ट्राँग हा तो पहिला माणूस हे तर सगळयांनाच माहित आहे. चंद्रावर पहिले पाऊल टाकल्यावर नील आर्मस्ट्राँगने म्हटले होते, "मानवाचे जरी हे छोटे पाऊल असले तरी मानवतेसाठी हा खूप मोठा पल्ला आहे." हे किती खरे होते हे गेल्या वर्षांत सर्वांनी बघितलेच आहे. आज आपण तत्कालीन घडामोडींवर प्रकाश टाकणार आहोत.

२० जुलै १९६९ साली जेव्हा मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले तेव्हा जगभरातल्या ६० कोटी लोकांनी ही घटना पाह्यली होती. २० जुलै रोजी दुपारच्या ४.१७ मिनिटांनी अपोलो ११ हे यान माणसाला घेऊन चंद्रावर उतरणारे पहिले यान ठरले होते.

या यानात तीन लोक होते- नील आर्मस्ट्राँग हे कमांडर, बज अल्ड्रिन हे ल्यूनार मॉड्युल पायलट, मायकल कॉलीन्स हे कमांड मॉड्युल पायलट. अपोलो यानात कोलंबिया नावाचे कमांड मोड्युल आणि ईगल नावाचे ल्यूनार मोड्युल होते.

यानाने ७६ तासांत तब्बल २ लाख ४० हजार मैल इतका प्रवास केला होता. ABC, NBC आणि CBS यांनी एकत्र करून जवळपास १२ मिलियन डॉलर आणि ११ मिलियन डॉलर फक्त रविवार संध्याकाळ ते सोमवार सकाळपर्यंतचा काळ कव्हर करण्यासाठी खर्च केले होते.

आता सगळी प्रक्रिया तारीखवार पाहूया..

२५ मे १९६१ - अमेरिकन राष्ट्रध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी संसदेला संबोधित करताना म्हटले होते, "मला विश्वास आहे की या देशाने स्वतःला वचन दिले तर हवे ते ध्येय आपण गाठू शकतो. या दशकाच्या अंतापर्यंत माणूस सुखरूप चंद्रावर जाऊन परत येईल. पूर्ण दशकभर या प्रोजेक्ट एवढा महत्वाचा दुसरा कुठलाच प्रोजेक्ट मानवतेसाठी महत्वाचा नाही. हा जास्त खर्चिक देखील असणार नाही आणि सध्या करायला तर अशक्य बिलकुल नसेल."

२१ नोव्हेंबर १९६२ - अमेरिकन अध्यक्ष केनेडी यांनी नासाचे चेयरमन जेम्स वेब यांना म्हटले की, "ही गोष्ट कुणाला आवडो न आवडो, पण चंद्रावर माणूस पाठवण्याची जी आपली शर्यत आहे ती निश्चितच रशियाआधी आपल्याला जिंकायची आहे."

१८ मे १९६९ - अपोलो १० फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून निघाले. ही फक्त अपोलो ११ साठीची चाचणी होती. या यानात थॉमस स्टॅफर्ड, जॉन यंग आणि युजीन सर्नन ही तीन लोक होते. चंद्राच्या कक्षेजवळ जाऊन ते ८ दिवस ३ मिनिट ३ सेकंदांनी परत आले.

१६ जुलै १९६९ - सकाळी ९ वाजून ३२ मिनिटांनी EDT अपोलो ११ पॅड A लाँच कॉम्प्लेक्स ३९, केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडा येथून निघाले.

२० जुलै १९६९ - १ वाजून ४७ मिनिटांनी ल्यूनार मॉड्युलमध्ये असलेले आर्मस्ट्राँग आणि अल्ड्रिन हे कमांड मॉड्युलपासून वेगळे झाले. कॉलिन्स हे कोलंबियाच्या ऑनबोर्डवर चंद्राच्या कक्षेला परिभ्रमण करत राहिले.

दुपारचे ४.१७ वाजता इगलने लँड केले.

४:१८ PM ला ह्यूस्टन ट्रांक्वीलिटी बेस इथे आहे, इगलने लँड केले आहे असा मॅसेज आर्मस्ट्राँगने दिला. जेव्हा ल्यूनार चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले तेव्हा त्यात ४० सेकंद पुरेल एवढेच इंधन उरले होते.

१०:५६ PM - आर्मस्ट्राँगने त्याचे प्रसिद्ध उद्गार काढले. "माणसासाठी जरी हे छोटे पाऊल असले तरी मानवतेसाठी ही मोठी मजल आहे." कारण आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाय ठेवणारा पहिला माणूस ठरला होता.

अंदाजे ११:१५ PM ला अल्ड्रिनसुद्धा चंद्रावर पोचला. त्यांनंतर तिन्ही सदस्य आणि अध्यक्षांची सही असलेले पत्र वाचून दाखवले. "इथे पृथ्वीवरील माणसांनी पहिले पाऊल ठेवले होते. जुलै 1969, आम्ही इथे मानवतेच्या शांतीसाठी आलो होतो."

११:४८ मिनिटांनी अध्यक्ष निक्सन यांचे आर्मस्ट्राँग आणि अल्ड्रिन यांच्याशी ओव्हल ऑफिसमधून रेडिओच्या माध्यमातून बोलणे झाले. "हा कदाचित सर्वात मोठा ऐतिहासिक फोन कॉल असेल", असे बोलणे करून पुढे जवळपास दोन मिनिटं ते बोलले आणि फोन कट झाला.

आर्मस्ट्राँग आणि अल्ड्रिन यांनी पुढे दोन तास चंद्रावर दगड आणि इतर सामुग्री गोळा केली.

२१ जुलै १९६९ - दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून ५४ मिनिटांनी इगल कोलंबियाला भेटण्यासाठी चंद्रावरून निघाले.
५:३५ PM - इगलमधील सगळी सामग्री कोलंबियात टाकण्यात येऊन इगल फेकून देण्यात आले आणि सगळ्यांनी पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरु केला.

२२ जुलै १९६९ - कोलंबियाने पृथ्वीच्या परिघात प्रवेश केला.

२४ जुलै १९६९ - दुपारी १२वाजून ५० मिनिट या वेळेवर, ८ दिवस ३ तास आणि १८ सेकंदांनी तिन्ही वैज्ञानिक परत आले. आल्यावर लागलीच ते क्वारंटाइन झाले.

१० ऑगस्ट १९६९ - शास्त्रज्ञांना क्वारंटाईनमधून सोडण्यात आले.

१९ जुलै २०१९ - द स्मिथसोनियन यांच्या नॅशनल एअर अँड स्पेस म्युजियमने अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ द इंएरियर अँड ५० प्रोडक्शन यांच्या पार्टनरशिपमधून या घटनेचा ५० वा वाढदिवस साजरा करण्याचे घोषित केले. त्यात अपोलो ५० : गो फॉर द मुन हे प्रदर्शन इस्ट वाशिंग्टन येथे जुलै १६ ते जुलै १८ अशा तीन रात्रींसाठी भरवले.

 

खरंच, मानवी इतिहासात ही मोठी घटना होती!!

सबस्क्राईब करा

* indicates required