f
computer

डोकं छाटलेला हा कोंबडा १८ महिने कसा जिवंत राहिला ?

मंडळी, साधारणपणे कोंबड्याची मान छाटल्यावर कोंबडा मारतो, पण ७३ वर्षांपूर्वी एक असा कोंबडा होऊन गेला जो उरलेल्या शरीरासोबत १८ महिने जगला. ही whatsapp विद्यापीठातली भाकडकथा नाही राव. खरी गोष्ट आहे. चला तर आज या अजब कोंबड्याची कहाणी जाणून घेऊया. 

१० सप्टेंबर १९४५ साली फ्रुटा, कोलॅराडो येथे लॉयड ऑल्सन आणि त्याची पत्नी क्लारा आपल्या शेतात कोंबड्या कपात होते. ऑल्सन एकेका कोंबडीची मान छाटत होता तर क्लारा त्यांना साफ करत होती. जवळजवळ ४० ते ५० कोंबड्या कापून झाल्यानंतर जेव्हा ते मांस घेऊन जायला उठले तेव्हा त्यातला एक कोंबडा डोकं छाटलेल्या अवस्थेत पळताना दिसला. दोघांनी मिळून कोंबड्याला सफरचंदाच्या पेटीत बंद केलं आणि ते निघून गेले.
 

दुसऱ्या दिवशी लोयड ऑल्सनने पेटी उघडली तर कोंबडा अजूनही जिवंत होता. मग ऑल्सनने मांस विकायला जाताना त्या कोंबड्यालाही सोबत नेलं. ऑल्सनने बाजारात कोंबड्याच्या नावावर पैज लावली आणि पैजेत बियर आणि अन्य वस्तू जिंकल्या. यानंतर ही बातमी फ्रुटा भागात आगीसारखी पसरली. एका स्थानिक दैनिकाने एक रिपोर्टर पाठवून या घटनेची खात्री करून घेतली. लवकरच हा कोंबडा “हेडलेस चिकन” म्हणून प्रसिद्ध झाला.

या कोंबड्याला नाव पण होतं बरं – “माइक“ पुरा नाम “हेडलेस माइक”

तर, हा माइक उर्फ हेडलेस चिकन रातोरात फेमस झाला. एका साईड शोचे प्रमोटर ‘होप वेड’ हे ऑल्सनला आपल्या शो मध्ये येण्याचं आमंत्रण देऊन गेले. ऑल्सन माइक सोबत शो मध्ये पोहोचला. या शो मधूनच होप वेडने माइकला ‘मिरॅकल माइक’ नाव दिलं.

होप वेडच्या शो मधून ऑल्सन युटा युनिव्हर्सिटीत गेला. तिथे माइकची तपासणी केली गेली. तेव्हा अशी अफवा पसरली होती की माइकच्या जिवंत राहण्यामागचं रहस्य जाणून घेण्यासाठी युटा युनिव्हर्सिटीतील वैज्ञानिकांनी अनेक कोंबड्या मारल्या. यातलं तथ्य कोणालाच कधी कळू शकलं नाही.

(ऑल्सन आणि क्लारा)

ऑल्सन, क्लारा आणि माइक मग अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले. कॅलिफोर्निया, अॅरिझोना, दक्षिण पूर्व अमेरिका असा हा प्रवास होता. अमेरिकेतल्या काही नागरिकांनी डोकं नसलेल्या या विचित्र कोंबड्याबद्दल जळजळीत असं मत दिलं. ऑल्सनची तुलना त्यांनी हिटलरच्या ‘नाझी’ लोकांशी केली. ऑल्सनची ओळखच मुळात ‘डोकं नसलेल्या कोंबड्याचे मालक’ अशी झाली होती.

कॅलिफोर्निया, अॅरिझोना, दक्षिण पूर्व अमेरिकेच्या दौऱ्यानंतर ऑल्सन परिवार माइक सोबत अमेरिकेच्या ‘फिनिक्स’ भागात गेला. दुर्दैवाने तिथेच १८ महिन्यांनी माइकचा मृत्यू झाला. 
माइकचा मृत्यू कसा झाला ?

माइकला ड्रॉप्सच्या सहाय्याने त्याच्या अन्ननलिकेतून ज्यूस किंवा इतर द्रव अन्न पदार्थ दिले जायचे. अन्ननलिकेद्वारेच माइकला श्वास घेता यायचा, त्यामुळे हा भाग संवेदनशील व नाजूक होता. अन्ननलिकेचा हा भाग दररोज इंजेक्शन सारख्या पिचकारीने साफ केला जायचा जेणेकरून श्वास कोंडला जाऊ नये. फिनिक्स मधल्या एका हॉटेल मध्ये जेव्हा रात्रीच्या सुमारास माइकचा श्वास कोंडला तेव्हा नेमकं इंजेक्शन सापडलं नाही. ऑल्सन इंजेक्शन एका शो मध्ये विसरला होता. जोवर दुसऱ्या इंजेक्शनची व्यवस्था झाली तोवर माइकचा मृत्यू झाला होता. अशा प्रकारे एका सुऱ्याने नाही तर श्वास कोंडून माइक मेला. 

अनेक वर्षांपर्यंत कोणालाच माहित नव्हतं की माइकचं पुढे काय झालं. हे सत्य उघड केलं ऑल्सनच्या नातुने. ऑल्सनने मारण्याच्या पूर्वो त्याच्या समोर माइक श्वास कोंडून मेल्याची कबुली दिली होती. तो पर्यंत ऑल्सननेने अशी समजूत पसरवली होती की त्याने कोंबड्याला विकलं.

अनेक वर्षांपर्यंत कोणालाच माहित नव्हतं की माइकचं पुढे काय झालं. हे सत्य उघड केलं ऑल्सनच्या नातुने. ऑल्सनने मारण्याच्या पूर्वो त्याच्या समोर माइक श्वास कोंडून मेल्याची कबुली दिली होती. तो पर्यंत ऑल्सननेने अशी समजूत पसरवली होती की त्याने कोंबड्याला विकलं.

आता महत्वाचा प्रश्न – “मुंडी छाटलेली असताना कोंबडा जिवंत कसा राहिला ?”

त्याचं असं आहे, वैज्ञानिकांच्या मते कोंबडीचा मेंदू तिच्या डोळ्यांना जोडणाऱ्या हाडांच्या मागच्या बाजूला असतो. माइकच्या बाबतीत त्याचा २० टक्के मेंदू कापला गेला होता तर ८०% मेंदू जो शरीर, हृदय, भूक आणि अन्नपचन नियंत्रित करतो तो भाग सहीसलामत राहिला होता. यात थोडा नशिबाचा भागही आहे कारण मुंडकं छाटल्यानंतर रक्तस्त्रावामुळे माइक मारू शकला असता, पण वेळीच तिथे रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने तो वाचला. 

माइकच्या चमत्कारानंतर इतर अनेकांनी असाच प्रयत्न केला. एवढंच काय ऑल्सन महाशयही दुसरा माइक जन्माला घालायला निघाले होते. पण सगळेच अयशस्वी ठरले राव. एक मात्र झालं, ऑल्सन परिवाराची गरिबी निघून गेली.

मंडळी, कालांतरानी फ्रुटा येथे माइकचा पुतळा उभारला गेला. तिथे आजही दरवर्षी Headless Chicken महोत्सव भरतो.